रतन अडकमोलकढोली, ता.एरंडोल : तालुुक्यातील खर्ची बुद्रूक येथील ग्रामसेवक गेल्या १५ आॅगस्टपासून गावात येत नसल्याने ‘ग्रामसेवक आला की कळवा आणि एक हजार रुपये मिळवा’ अशी घोषणा ग्रामस्थांनी केली आहे. ही घोषणा परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.खर्ची बुद्रूक गावासाठी ग्रामसेवक म्हणून चंद्रकांत सावकारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ग्रामसेवक गत १५ आॅगस्टपासून गावात येत नसल्याची ग्रामस्थांची व्यथा आहे. ग्रामसेवकाअभावी गावाला विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची व्यथा आहे.दरम्यान, कोरोनासारखी महामारी व गावात घाणीचे साम्राज्य असल्याने जास्त आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.सामाजिक अंकेक्षण कार्यक्रमात केली घोषणादरम्यान, खर्ची बुद्रूक येथे म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम जिल्हा समन्वयक संजय पाटील, ग्रामविस्तार अधिकारी तथा प्रशासक आर.एस.सपकाळे, कृषि सहायक सी.बी. जगताप, नितीन कोळी, विकेश पावरा, गुंजन पाटील, तनविर पिंजारी, प्रशांत सोनवणे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून कामे होत नसल्यामुळे तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. परिणामी गावात ग्रामसेवक आला की कळवा आणि एक हजार रुपये मिळवा अशी घोषणाच ग्रामस्थांनी केली आहे.याविषयी प्रशासक आर.एस.सपकाळे यांनी सांगितले की, ग्रामसेवक सावकारे यांना खर्ची बुद्रूक येथील काम थांबवण्याचे सांगण्यात आले असून, त्यांची बदली होणार असल्याचे सांगितले.
‘ग्रामसेवक आला की कळवा आणि एक हजार रुपये मिळवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 7:37 PM
‘ग्रामसेवक आला की कळवा आणि एक हजार रुपये मिळवा’ ही घोषणा परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
ठळक मुद्देखर्ची बुद्रूक : १५ आॅगस्टपासून येत नसल्याची ग्रामस्थांची तक्रारसामाजिक अंकेक्षण कार्यक्रमात केली घोषणा