पहूर, ता. जामनेर : ‘लोकमत’ने रक्तदानाची महाचळवळ हाती घेतली. ‘लोकमत रक्ताचे नाते’ या संकल्पनेअंतर्गत पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले असून, चला रक्तदान करूया, असे आवाहन पेठ ग्रुपग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायतकडून करण्यात येत आहे.
लोकमत समूहाचे एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजयबाबू दर्डा यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचे नाते’ मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत लोकमत समूह, पेठ ग्रुपग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ जुलै रोजी पेठ ग्रुपग्रामपंचायतमध्ये सकाळी नऊ वाजता सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यात पेठच्या सरपंच नीता रामेश्वर पाटील, उपसरपंच श्यामराव सावळे, कसबेच्या सरपंच आशा शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव यांच्यासह गावातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, शासकीय कार्यालय, खाजगी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तरुण मित्रमंडळ, मेडिकल असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, शैक्षणिक संस्था, पत्रकार संघटना, तसेच व्यक्तिगत पातळीवरूनदेखील शिबिरात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक व प्रगतिशील शेतकरी अशोक पाटील यांनी ‘मी रक्तदान करणार, आपणही करा..’ असे आवाहन केले. लेले विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी रक्तदान करणाऱ्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना सुटी जाहीर केली आहे.
050721\img-20210604-wa0130.jpg~050721\img-20210503-wa0066.jpg
कप्शन सरपंच निता रामेश्वर पाटील.~कँप्शन सरपंच कसबे आशा शंकर जाधव