कुजबूज..
जळगाव महापालिकेत सत्तांतरानंतर बदल्याच राजकारण सुरू झाले आहे. भाजपशी गद्दारी केली म्हणून बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी भाजपने तयारी केली असून हे नगरसेवक अपात्र कसे होतील यासाठी रणनीती आखली असतानाच, बंडखोरांनीही बदल्याला बदल्याने उत्तर देत गटनेतेपद आपल्याकडे खेचून भाजप नगरसेवकांनाच व्हिप पाठवून जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच व्हिप धुडकावला म्हणून भाजप नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासाठी बंडखोरांनी तयारी सुरू केली आहे. हे राजकारण आता बदल्याचा दिशेने जात असून, कोणाचा बदला लवकर घेतला जातो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. भाजप नगरसेवकही अडीच वर्षात सत्ता गमाविल्याचे शल्य घेऊन बंडखोरांवर कारवाईसाठी प्रयत्न करत आहेत. तर बंडखोरदेखील अडीच वर्षात वरिष्ठांनी दिलेल्या वागणुकीचा बदला घेण्यास तयार आहेत. मात्र, बदल्याचा राजकारणात जळगावकरांचा बळी जाऊ नये म्हणजे झाले.