जळगाव : ग्राहकाला कमी धान्य देणे तालुक्यातील एका स्वस्त धान्य दुकानादाराला चांगलेच भोवले असून बुधवारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी तक्रार प्राप्त भादली येथील माऊली बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे स्वस्त धान्य दुकानाचा (क्रमांक १९४) परवाना रद्द करण्यात आला आहे़भादली येथे माऊली बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे स्वस्त धान्य दुकान क्रमांक १९४ आहे़ मात्र, दुकानधारकाकडून नेहमीच कमी धान्य दिले जाते़ कधी-कधी धान्यच दिले जात नाही, शिधा पत्रिकेत पाच नावे असताना ३ जणांचे धान्य मिळते, मोफत तांदूळ मिळत नाही अशा २१ ग्राहकांकडून वेगवेगळ््या तक्रारी तहसील कार्यालय व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या़ या तक्रारींची दखल घेवून पुरवठा अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांनी दुकानाची पाहणी करीत जाबजबाब नोंदवून घेतले़ अखेर या प्रकरणाच्या सुनावणीअंती बुधवारी भादली येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १९४ याचा परवाना रद्द करण्यात आला आहे़ तसेच हे दुकान तात्काळ दुसºया दुकानास जोडण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत़
भादलीतील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 9:02 PM