मनोज जोशीपहूर, ता.जामनेर : येथील सिध्दिविनायक हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. वैद्यकीय परवान्याचे नूतनीकरण न करता, वैद्यकीय सेवा सुरू होती. यासह रुग्ण सेवेतील ठपका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या रुग्णालयावर ठेवला आहे.पहूर कसबेतील डॉ.सचिन भडांगे यांचे सिध्दिविनायक हॉस्पिटल रुग्णसेवेतील त्रुटी, उल्लंघन व अनिमितता या बाबींमुळे आरोग्य प्रशासनाच्या रडार आले आहे.रेमडेसिविर इंजेक्शन वापरण्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून डॉ.भडांगे यांना नोटीस बजाविण्यात आली. मात्र याचा खुलासा सादर न केल्याने दि. २१ एप्रिल रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण यांनी हॉस्पिटलची प्रत्यक्ष पाहणी केली. यादरम्यान कोविड सेंटर चालविण्यासाठी पात्र डॉक्टर नसतानाही उपचार सुरू असल्याचे निदर्शनास आले. यामुळे तत्काळ कोविड सेंटरची परवानगी रद्द करण्यात आली.आता रुग्ण सेवा बंदचे निर्देशपुढील कारवाईसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून प्रस्ताव जिल्हा आरोग्यधिकारी यांच्याकडे हस्तांतरित झाला होता. बाँम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अंतर्गत पुढील आदेश होईपर्यंत वैद्यकीय परवाना तात्पुरता निलंबित केल्याचे जिल्हा आरोग्यधिकाऱ्यांनी २९ एप्रिल रोजी आदेश डॉ.भडांगे यांना दिले आहे.काय ठपकाकोविड सेंटरमध्ये फिजिशियन किंवा अधिकार प्राप्त डॉक्टर यांना रेमडेसिविर औषध देण्याचा अधिकार असताना डॉ.भडांगे यांनी स्वतः औषधे दिली. ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मिळाली नाही. या औषधीचा तुटवडा होण्यास डॉ.भडांगे जबाबदार आहे. बाँम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन वैधता दि. ३१ मार्च २०२० मध्ये संपुष्टात आली. असे असतानाही परवाना नूतनीकरण केले नाही. ही बाब अतिशय गंभीर असल्याचा ठपका आरोग्य यंत्रणेने ठेवला आहे.प्रतिक्रियाअनियमितता व रुग्णसेवेतील त्रुटींमुळे वैद्यकीय परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे. नूतनीकरण करण्यासाठी बाँम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अंतर्गत असलेल्या समितीच्या चौकशीनंतर त्यांच्याच स्तरावरून पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे रुग्णसेवा बंदचे आदेश दिले आहेत.-डॉ.डी.एस.पाटोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगावबाँम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन निलंबित केल्यावर कोविड सेंटर चालविण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे संबंधित डॉक्टरांची रुग्ण सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे.-डॉ.नागोजीराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगावरेमडेसिविरबाबत खुलासा सादर केला आहे. येथून पुढे कोणत्याही कोविड नियंमाचे उल्लंघन होणार नाही,याची काळजी घेतली जाईल.-डॉ.सचिन भडांगे, संचालक, सिध्दिविनायक हॉस्पिटल, पहूर कसबे, ता.जामनेर
पहूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 5:02 PM
पहूर येथील खासगी दवाखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.
ठळक मुद्देजिल्हा आरोग्य अधिकारी यांची कारवाईरुग्ण सेवा तात्पुरती बंद करण्याचे आदेशवर्षांपूर्वी वैद्यकीय परवाना वैधता संपुष्टातनूतनीकरण न करता रुग्णांवर सुरू होते उपचारकोविड सेंटरची परवानगी रद्द