जळगाव : यापूर्वी प्राण्यांची भिती वाटत नव्हती़ मात्र, मागील वर्षी गावातील एका शेतकºयावर वाघाने हल्ला चढवला आणि त्यात त्या शेतकºयाचा मृत्यू झाला़ या घटनेपासून गावामध्ये प्रचंड भीती पसरली आहे़ जीव मुठीत धरून शेतात कामाला जावे लागते़, रात्री चार-पाच शेतकरी मिळून शेतात रखवालीसाठी जात असतो... पुन्हा घरी परतणार की नाही, याची शाश्वती नसते, असे थक्क करणारे अनुभव डोलारखेडा ता. मुक्ताईनगर येथील शेतकºयांनी सांगितले. त्यावेळी व्याघ्रसंवर्धन परिषदेसाठी उपस्थित असलेले सदस्यही आवक झाले.या दोन दिवसीय व्याघ्रसंवर्धन कार्यशाळेस शनिवारपासून सुरुवात झाली. यात दुपारच्या सत्रात डोलारखेडा येथील शेतकरी विनोद थाटे, पुंडलिक पाटील, बंडू मोरे, महेंद्र पाटील, भागवत इंगळे, पुरूषोत्तम सोनार, वासुदेव कोळी यांनी अनुभव कथन केले़पुंडलिक पाटील म्हणाले की, गावापासून काही अंतरावर शेत आहे, त्यामुळे जंगतातून शेतात जावे लागते़ पूर्वीपासून जंगलात वाघ, अस्वल तसेच हरिण, रान डुकरांचा संचार आहे़ रात्री-अपरात्री शेतात जावे लागते. त्यामुळे वाटेत वन्यप्राणी बघायला मिळतात़ या प्राण्यांची भिती वाटत नव्हती़मात्र, मागील वर्षी गावातील एका शेतकºयावर वाघाने हल्ला चढवला आणि त्यात त्या शेतकºयाचा मृत्यू झाला़ त्या घटनेपासूनच गावामध्ये वाघाची प्रचंड भीती पसरली आहे.गटा- गटाने जातो शेतातरानडुक्कर, सांबर हे पिकांचे नुकसान करत असल्यामुळे रात्री शेतात रखवालीसाठी जावे लागते़ मात्र, आपल्यावर वाघ कधी हल्ला करेल, याची भिती असल्यामुळे आम्ही चार ते पाच शेतकरी मिळून रात्री शेतात रखावालदारीसाठी जातो़ आपण घरी परतणार की नाही ही सुध्दा भिती मनात असते, असे त्यांनी सांगितले़ सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घराबाहेर शौचास जात असतना वन्यप्राणी दिसतात़ शेताला कुपंन करण्याचे संबंधित अधिकाºयांनी दिलेले आश्वासन अद्याप देखील पूर्ण केलेले नाही़पिकांचे नुकसान झाल्यास वर्षातून एकदाच तुटपुंजे नुकसान भरपाई वन्य विभागाकडून मिळत असते़ या संपूर्ण प्रकारामुळे आम्ही त्रस्त झालेलो आहोत, असेही पुंडलिक पाटील यांनी सांगितले.डोलारखेडा-मुक्ताई-भवानी देणार भेटरविवारी परिषदेतील मान्यवर वन्यप्राणी संस्थांच्या सदस्यांसह मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा या गावाला तसेच मुक्ताई- भवानी या भागाला भेटी देणार आहेत़ येथील नागरिकांशी संवाद साधतील व पाहणी करणार आहेत़ ही मान्यवरांची टीम सकाळीच डोलारखेडासाठी रवाना होणार आहे़ सध्यपरिस्थितीची ही टीम पाहणी करणार आहे़जीव मुठीत धरून शेतात कामाल जावे लागते़ मागील वर्षी वाघाच्या हल्ल्यााात झालेल्या शेतकºयाच्या मृत्यूमुळे भितीचे वातावरण निमार्ण झाले़ मात्र, अन्यप्राण्यांच्या वाघाने केलेल्या शिकारीचे सुध्दा घटना घडत आहेत़ कधी-कधी रात्रीच्या सुमारास गावापर्यंत वाघ येत असल्याचेही अनेकांनी बघितले़ अनेक वर्षापासून गावात राहत असून कधीही या घटना घडल्या नाहीत़ मागील वर्षीच्याच घटनेमुळे गावात भिती पसरली आहे़ संबंधित विभागाने शेतांना कुंपण घालून देण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र, वर्ष उलटून सुध्दा अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही़, असे विनोद थाटे व महेंद्र पाटील या शेतकºयांनी सांगितले.पाणवठ्यावरील प्राणीगणना योग्यजंगलातील पाणवट्यावरून केली जाणारी वन्यप्राण्यांची गणना ही बंद केली जात आहे़ मात्र, ही गणना करण्याची पध्दती अत्यंत योग्य आहे़ ही पध्दती बंद पडायला नको, असे मत एस़एस़मिश्रा यांनी व्यक्त केले़ त्यानंतर त्यांनी यावल अभयारण्यावर सविस्तर माहिती दिली.
जीव मुठीत घेऊन शेतात जातो, परतण्याची शाश्वती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 10:42 PM