हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : आशिया महामार्गावरील कोथळी बायपासवरील गळक्या पाइपलाइनवरील साचलेल्या डबक्यातील पाणी पिऊन शेकडो शेळ्या, मेंढ्या, गाई आपली तहान भागवत आहेत.शेतकरी ठिबकवर शेती करीत असल्याने पूर्वी वाहणारे पाणी आता कोठेच दिसत नाही. पूर्वी त्यावर पीक नसलेल्या ठिकाणी वाहणाऱ्या पाण्यावर शेळ्या-मेंढ्या, गाई पाणी पित असत. रानावनात भटकंती केल्यावर आपली आपली तहान भागवत असत. आता मात्र सर्वदूर सिंचन शेती असताना भटकंती करणाºया मेंढपाळ लोकांसह पशुपालकांना मोठी पायपीट करावी लागत आहे. सहा-सात किलोमीटर अंतरावर गेल्यावर शेळ्या-मेंढ्यांसह गाईंना सकाळच्या वेळी आणि दुपारच्या पाण्याची नितांत गरज असते. त्यासाठी मात्र पायपीट करावी लागत आहे. अशातच पाईप लाईनचे गळतीचे पाणी त्यांच्यासाठी जीवनदायी ठरले आहे.काठेवाडींवर संकटअशातच उदरनिर्वाहाचे साधन असलेले ठेलारी, गायी पाळणारे लोक यांना परिसरात रानोमाळ भटकत आपल्या पशुंची तहान भागवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विशिष्ट ठिकाणी जावून चटई करून पाण्यासाठी मात्र भटकंती करावी लागत आहे. अचानक सापडलेल्या डबक्यातील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. गावात गावहाळावर गुरे पाणी पितात, मात्र रानोमाळ भटकणाºया मेंढापाळ लोकांच्या पशुधनाला रानोमाळ भटकंती करत साचलेल्या डबक्यात पाण्यावरच अवलंबून राहण्याची वेळ आहे. अनेक वेळा शेताच्या बांधावर पाणी मिळणे दुर्मीळ झाले आहे. मोठी जोखीम स्वीकारत, कधीकधी शेतकऱ्यांच्या नुकसानीला सामोरे जात. पशुंसाठी पोटच्या गोळयाप्रमाणे संगोपन करत शिव्याशाप खावे लागतात. मोठ्या संख्येने असलेल्या शेळ्या-मेंढ्या व गायींचे संगोपन करणे, त्यांच्या चारा पाण्यासाठी भटकणे हे फारच जिकिरीचे ठरत आहे.कांद्याची पात ठरते वरदानभटकून भटकून एखाद्या शेतात जर कांद्याची पात मिळाली तर तेवढेच फक्त मेंढ्यांना खायला मिळते. मात्र नुकतेच काट्या-बोराट्या ओढत पूर्ण शिवाराला वळसा घेऊन भुकेल्यापोटी मेंढ्यांना फिरावे लागत असल्याचे मेंढपाळ, गुराख्यांकडून सांगण्यात आले. शेतात चारा उपलब्ध नाही. पावसाळ्याला अजून महिन्यावर कालावधी बाकी आहे. अशा परिस्थितीत चारा विकत घेणे कठीण आहे. पशुंंना काय खाऊ घालावे याची चिंता पशुपालकांना चिंता लागली आहे.शेतात मेंढ्या बसवण्यासाठी शोधाशोध, एखाद्या शेतकºयाच्या शेतात चारा असला तर रात्र बसवण्यासाठी खूपच परिश्रम करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी कांद्याची पात मिळाली तर तेवढेच फक्त मेंढ्यांना खायला मिळते. नाही तर रानोमाळ भटकत असताना जंगलातील काहीच मिळत नाही. त्यावरच अवलंबून रहावे लागते. चारा-पाण्याचा लाभ मिळावा, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यातच ठरलेली पाईपलाईनची गळती मात्र जीवनदायी ठरली आहे.
गळकी जलवाहिनी गुरांसाठी ठरतेय जीवनदायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 7:38 PM
आशिया महामार्गावरील कोथळी बायपासवरील गळक्या पाइपलाइनवरील साचलेल्या डबक्यातील पाणी पिऊन शेकडो शेळ्या, मेंढ्या, गाई आपली तहान भागवत आहेत.
ठळक मुद्देकोथळी बायपासजवळील डबक्यातील पाणी भागवते मेंढ्या-गुरांची तहानचारा-पाण्यासाठी मेंढपाळांची भटकंती नित्याची