शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

लाइनमनचा सोनाळ्याच्या जंगलात विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 10:57 PM

तुटलेली जंप विद्युतपोलवर  जोडताना राजेंद्र प्रकाश पवार (४२)  यांना विजेचा धक्का बसल्याने जागीच अंत झाला.

ठळक मुद्देशाॅर्टसर्किटने आग : वनअधिकाऱ्यांना आढळला लटकलेला मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क

पहूर, ता जामनेर : सोनाळा, ता. जामनेर येथील जंगलात  तुटलेली जंप विद्युतपोलवर  जोडताना राजेंद्र प्रकाश पवार (४२)  यांना विजेचा धक्का बसल्याने जागीच करुण अंत झाल्याची घटना घडली आहे. लक्षात न आल्यामुळे पोलवर खूप वेळ मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  राजेंद्र प्रकाश पवार (गारखेडा, जामनेर) येथील रहिवासी असून पहूर येथील वीज वितरण उपविभागीय  ग्रामीण कार्यालय कक्ष-२ येथे लाइनमन (वरिष्ठ तंत्रज्ञान) पदावर कार्यरत आहे. पवार सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास  सोनाळा जंगलात ११ के.व्ही.  लाइनच्या पोलवर तुटलेली जम्प टाकण्यासाठी  एकटेच गेले. पोलवर चढण्यापूर्वी त्यांनी परमिट घेऊन पुरवठा खंडित केल्याचे  उपकार्यकारी अभियंता व्ही.डी. सोनवणे यांनी सांगितले आहे. पोलवर जम्पजोडणी चालू असताना क्राॅस (विरुद्ध) वीजपुरवठा आल्याने पवारचा या धक्क्याने जागेवर मृत्यू ओढवल्याचे सांगण्यात आले. 

शाॅर्टसर्किट झाले अन् जंगल भडकले...

घटना घडल्यानंतर सोनाळा भागाकडील जंगलात शाॅर्टसर्किटने आग लागली, याची माहिती वनरक्षक प्रसाद भारुडे, वनपाल संदीप पाटील, अशोक ठोमरे यांना मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले व  जंगलात आग विझविल्यानंतर  आग लागण्याचे कारण शोधत असताना या अधिकाऱ्यांना पोलवर मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी अनिल राठोड, प्रदीप चौधरी, गोपाळ गायकवाड व ज्ञानेश्वर बाविस्कर दाखल झाले. घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद जामनेर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येणार असून शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे केल्याचे पहूर पोलिसांनी सांगितले आहे. पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार असून पवार यांची परिस्थिती हलाखीची असल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावelectricityवीजDeathमृत्यूJamnerजामनेर