"दोन बायका फजिती ऐका"; शरद पवारांसमोरच खडसेंच्या निशाण्यावर अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 06:41 PM2023-09-05T18:41:53+5:302023-09-05T18:43:40+5:30

अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. 

''Listen to Two Wives Fajiti''; Ajit Pawar targeting Eknath Khadse in Jalgaon | "दोन बायका फजिती ऐका"; शरद पवारांसमोरच खडसेंच्या निशाण्यावर अजित पवार

"दोन बायका फजिती ऐका"; शरद पवारांसमोरच खडसेंच्या निशाण्यावर अजित पवार

googlenewsNext

मुंबई/जळगाव - जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारच्यावतीने मराठा समाजाला शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच, हा बेछूट लाठीमार, मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार झाल्याची शंका आहे, असा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यालाही सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलंय. त्यानंतर, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांना लक्ष्य करण्यात येत आहे. जयंत पाटील यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंनीही अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. 

जालन्यात लाठीचार्जचे आदेश वरून आले आहेत, असं काहीजण खुशाल सांगताहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, जर वरून आदेश आले हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू, राजकारण सोडून देऊ, असं आव्हान अजित पवार यांनी दिलं होतं. त्यानंतर, आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना प्रत्युत्तर देत आहेत. एकनाथ खडसेंनी सोमवारीच यावरुन प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, आज होम ग्राऊंड म्हणजेच जळगावमधील सभेत बोलताना अजित पवारांना लक्ष्य केलं. त्यावेळी, शऱद पवार हेही व्यासपीठावर होते. 

राज्यात तिघांचं सरकार आहे. एका मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री. दोन बायका फजिती ऐका, असे म्हणत एकनाथ खडसेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. अजित दादांनी इकडे उपमुख्यमंत्री असताना तिकडे पद घेतलं. अजित दादा म्हणजे स्मार्ट माणूस, बोलणे तसे करणारा माणूस, काम करणारा माणूस. पण, पक्ष बदलवला, पक्ष बदलवल्यानंतर स्वाभीमानी अजित दादा तिथे निर्णय घ्यायला लागले. मग, साखर कारखान्यांवर याला पैसे देऊ, त्याला पैसे देऊ, निर्णय झाला, स्वाक्षरी झाली. मग, देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा निर्णय रद्द करुन टाकला. हा केवढा अपमान आहे. 


अजित दादांना निर्णय घ्यायचे अधिकार नाहीत. अजित दादांनी निर्णय घेतला की त्याच्यावर कोंबडा आता फडणवीसांचा लागणार आहे. फडणवीसांची सही झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सही लागणार आहे. क्या हालत बना दी दादा तुमने, यहाँ तो शेर थे... तुम्हाला किंमत होती. आता, प्रत्येक फाईल जर तुम्हाला फडणवीसांकडे घेऊन जावी लागत असेल तर तुमचा स्वाभीमान गेला कुठे? असा सवाल एकनाथ खडसेंनी अजित पवारांना विचारला. जळगावमधील सभेत एकनाथ खडसेंच्या निशाण्यावर अजित पवारच दिसून आले. 
 

 

Web Title: ''Listen to Two Wives Fajiti''; Ajit Pawar targeting Eknath Khadse in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.