ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि़10- ग्रंथांची पालखी़ महापुरुषांच्या वेशभूषेतील चिमुकल़े़,घोडे, लेझीम व ढोल-ताशा पथकाच्या गजरात सकाळी निघालेल्या साहित्य दिंडीने रविवारी शहरात चैतन्य पसरले होत़े बैलगाडी, पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या शिक्षक-शिक्षिका, विद्याथ्र्यानी दिंडीतून पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडविल़े यावेळी फलकांव्दारे पर्यावरणाबाबत जनजागृतीही करण्यात आली़पर्यावरण शाळा व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे पर्यावरण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आह़े या पर्यावरण साहित्य संमेलनाला साहित्य दिंडीने प्रारंभ झाला़ संमेलनाध्यक्ष वीणा गवाणकर यांच्याहस्ते ग्रंथपूजन करुन सकाळी 8़30 बहिणाबाई उद्यानापासून दिंडीला सुरुवात झाली़ शोभा पाटील, सुधाकर क:हाडे, सुरेश चोकणे, सर्प अभ्यासक डॉ़ वरद गिरी, वन्यजीव अभ्यासक अभय उजागरे, पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र नन्नवरे उपस्थित होत़े दिंडीत विवेकानंद प्रतिष्ठानच्या आचार्य विद्यालय, शानभाग विद्यालय, विवेकानंद इंग्लिश मेडीयम स्कूल, विवेकानंद सीबीएसई स्कूल, पलोड स्कूल या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका मोठय़ा संख्येने सहभागी झाले होत़े शिस्तबध्द रॅली, अन् जल्लोषपूर्ण वातावरण भगवे फेटे धारण केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनीच्या ढोल-ताशा पथक, तसेच लेझीम पथकाने परिसर दणाणला़ पर्यावरण जनजागृतीचे संदेश फलक लक्ष वेधून घेत होत़े दिंडीत काठी फिरविणे यासह इतर थरारक प्रात्यक्षिकेही यावेळी विद्याथ्र्यानी केल़े बहिणाबाई उद्यानापासून साहित्य दिंडीला सुरुवात झाली़ महेश चौक, रिंगरोड, पोलीस लाईन, बेंडाळे चौक, मुख्य स्टेट बँक शाखा मार्गे जल्लोषपूर्ण वातावरणात दिंडीचा कांताई सभागृहाजवळ समारोप झाला़