सचिन देव ।जळगाव : उस्मानाबाद येथे झालेल्या ९३ व्या अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरुन वाद झाला. हा विरोध करणे चुकीचे आहे. मुळात साहित्यिक वा लेखकाला कुठलाही जात, धर्म वा पंथ नसतो. या जाती-धर्माच्या कारणावरुन भेदभाव करणे हे चुकीचे आहे. विरोध करणाऱ्यांनी या प्रकारची मानसिकता दूर ठेऊन, साहित्यिकांच्या लिखाणाकडे बघणे गरजेचे आहे. असे मत ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केले.जळगावात एका कार्यक्रमात आले असतांना ‘लोकमत’ प्रतिनिधीने दीपा देशमुख यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी केलेली ही बातचीत..प्रश्न : सोशल मीडियामुळे वाचन संस्कृतीवर परिणाम झाला आहे का ?उत्तर : नक्कीच, आज प्रत्येक जण मोबाईल असो की फेसबुकमध्ये इतका गुंतला आहे की त्यांना पुस्तके वाचायला आवडत नाहीत. बाजारात कुठल्या लेखकांची ,कुठली नवीन पुस्तके येत आहेत. याची बहुतांश लोकांना माहिती नसते. त्यामुळे हा सर्व परिणाम सोशल मीडियामुळे होत आहे. यासाठी आता शक्य झाले तर लेखकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले लिखाण इतरांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.प्रश्न : नवोदीत कवींना व्यासपीठ मिळण्यासाठी काय करायला हवे?उत्तर : नवोदिन कवींना आपल्या कथा, कविता सादर करण्यासाठी सामाजिक संस्थांनी विविध प्रकारची संमेलन आयोजित करायला हवीत. गेल्या वर्षी जळगावात पुलोत्सव झाला होता. तशा प्रकारची संमेलनही सतत होणे गरजेचे आहे. नवोदित कवींनीदेखील जिथे कुठे संमेलन असेल, तिथे स्वत:हून जायला हवे. कारण, समाजापर्यंत पोहचण्याचे हे सर्वांत मोठे माध्यम असते.प्रश्न : अच्युत गोडबोले यांच्या बरोबर आपण सहलेखिका म्हणून अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे, सध्या कुठल्या पुस्तकावर लेखन सुरु आहे?उत्तर : सध्या ‘जग बदलणारे ग्रंथ’ या पुस्तकाचे लेखन सुरु आहे. यामध्ये कार्ल मार्क्सचा ‘दास कॅपिटल’ या ग्रंथामध्ये काय लिहले आहे, भगवत गीतेमध्ये काय सांगितले आहे, बायबल मध्ये काय आहे. यासह ज्या प्रभावशाली ग्रंथांनी जग बदलले. अशा प्रभावशाली ग्रंथावर आधारीत ‘जग बदलणारे ग्रंथ’ या पुस्तकावर काम सुरु आहे.प्रश्न : ‘समलिंगी’ संबंधावरील पुस्तकाच्या लेखनातून आपण काय मांडण्याचा प्रयत्न करणार आहात ?उत्तर : मुळात समलिंगी संबंधाला विरोध करण्याचे कारणचं काय आहे. दोन समलिंग व्यक्ती एकमेकांना आवडले, ते एकमेकांसोबत आयुष्यभर रहायला तयार आहेत, मग त्या गोष्टींना विरोध कशासाठी करावा, वेगळ््या भूमिकेतून त्यांच्याकडे कशाला पहावे.मोदींबद्दल म्हणाल्या...महिला अधिकार संरक्षण (तीन तलाक) विधेयक २0१८ लोकसभेत गुरुवारी २४५ विरुद्ध ११ मतांनी मंजूर झाले. विधेयकावरील चर्चेसाठी गुरुवारी भाजपा व काँग्रेसने आपापल्या सदस्यांसाठी व्हीप जारी केले होते. असे असूनही तीन तलाक विधेयकावर आक्रमक भाषणे करणारे वेळी अनुपस्थित होते.
साहित्यिकाला कोणतीही जात, धर्म, पंथ नसतो..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 1:01 PM