जळगाव : उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी देऊळगावडे, सुजदे व भोलाणे या तीन गावांमध्ये गावठी दारु निर्मितीचे अड्डे उध्वस्त केले. त्यात ११ हजार ५११ लीटर रसायन, १७५ लीटर दारु व साहित्यासह २ लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अधीक्षक सी. पी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. के. कोल्हे, किरण पाटील, दुय्यम निरीक्षक एम. बी. सोनार, ए. एस. पाटील, व्ही. एम. पाटील, के. बी. मुळे, के. एन. बुवा, व्ही. एम. माळी, रिकेश दांगट, सागर वानखेडे, व्ही. जे. नाईक, सहायक दुय्यम निरीक्षक आय. बी. बाविस्कर, एम. डी. पाटील, विपुल राजपूत, नितीन पाटील, अमोल पाटील, अजय गावंडे, कुणाल सोनवणे, वाय.आर.जोशी, भूषण वाणी, विठ्ठल हटकर, भूषण परदेशी, राहूल सोनवणे, संतोष निकम व नरेंद्र पाटील यांच्या विशेष पथकाने हे धाडसत्र राबविण्यात आले.
सुजदे, भोलाणे व देऊळवाड्यात दारुचे अड्डे उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:40 PM