लोकमत न्यूज नेटवर्कअंतुर्ली, ता.मुक्ताईनगर : येथील आधुनिक सोयी असलेले पशुवैद्यकीय अधिकारी व सहाय्यक पशुधन विकास अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने पशुधन वाºयावर आहे. यामुळे गेल्या वर्षभरात जवळपास पन्नासपेक्षा अधिक पशुधनाचे बळी गेले आहेत.अंतुर्लीचे पशुवैद्यकीय रुग्णालय श्रेणी एकचे आहे, मात्र रुग्ण सेवा ही वाºयावरच आहे. येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सोमनाथ चव्हाण यांची १६ सप्टेंबर २०१७ रोजी नाशिक जिल्ह्यात बदली झाली. तेव्हापासून या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुधनाचे बळी जात आहेत. गेल्या वर्षभरात उपचाराअभावी बैल, गाय, म्हशी व शेळ्यांच्या रूपातून जवळपास पन्नासपेक्षा अधिक पशुधन मृत्युमुखी पडले आहे.या रुग्णालयाला परिसरातील अंतुर्ली, पातोंडी, नरवेल, भोकरी, धामणदे व बेलसवाडी ही सहा गावे जोडली आहेत. या गावांमध्ये राहणारे जवळपास सर्वच नागरिक शेती व्यवसाय करतात. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, शेतीच्या मशागतीसाठी बैलजोडी, गाई, म्हशी आदी वागवतात. दोन हजारांपेक्षा अधिक पशुधन त्यांच्याकडे आहे.बैलजोडी ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत असते. गाई, म्हशी किंवा बैल आजारी पडले, तर उपचारासाठी पशुपालकांचे खूप हाल होतात. शेवटी खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागतात. आर्र्थिक झळ सहन करावी लागते अन्यथा जनावर दगावण्याची भीती असते. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात प्रत्यक्षात कार्यरत एकमेव कंपाउंडर नामदेव बेलदार आहे. ते पशुधनावर किरकोळ स्वरुपाचे उपचार करतात. गंभीर आजार असेल तेव्हा खासगी उपचार करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीत गोरगरिबांच्या पशुधनाचे बळी जातात. यात त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होते.मी पशु वैद्यकीय अधिकाºयासंदर्भात जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे. पुन्हा वरिष्ठ अधिकाºयांना यासंदर्भात बोलेल.-वैशाली तायडे, सदस्या, जिल्हा परिषद, खामखेडा, ता.मुक्ताईनगरअंतुर्ली पशुवैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याचे मला आज समजते आहे. मी याविषयी आवाज उठवेल.-किशोर चौधरी, सदस्य, पंचायत समिती, पिंप्री नांदूर, ता.मुक्ताईनगर
अंतुर्ली येथे पशुधन वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 5:33 PM
वर्षभरात ५० पशुंचा मृत्यू : पशुवैद्यकीय अधिकाºयाच्या बदलीनंतर नियुक्तीच नाही
ठळक मुद्देपशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाण यांची बदली झाली तेव्हापासून या रुग्णालयाचा तूर्त कारभार पंचायत समितीचे पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी डॉ.चव्हाण यांच्याकडे दिलेला आहे, परंतु ते वर्षभरात एकही वेळेस आलेले नाहीत, अशी पशुपालकांची व्यथा आहे.सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पी.एस.बाविस्कर यांची नियुक्ती अंतुर्ली येथे असून, पगारसुद्धा येथेच घेतात, परंतु काम प्रतिनियुतीच्या ठिकाणी जामनेर तालुक्यात करतात.