जळगाव,दि.11 - ग्राहकांना साद, ग्राहकांशी संवाद या ब्रीद वाक्याप्रमाणे महावितरण कंपनीने ग्राहकांना दज्रेदार सुविधा मिळावी, यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीचे आवाहन केले होत़े त्यानुसार जळगाव परिमंडळात 1 लाख 74 हजार 371 हजार ग्राहकांनी कंपनीकडे क्रमांकांची नोंदणी केली असून त्यांना रिडींग घेतल्यापासून ते वीज बिलभरण्यार्पयतचे संदेश पाठविण्यात येत आह़े आता लवकरच ग्राहकांना भारनियमनाबाबतचेही संदेश पाठविले जाणार आह़े
कंपनीकडे मोबाईल नंबर नोंदणी केलेल्या ग्राहकांना कंपनीच्या संगणकीय बिलींग प्रणालीनुसार रिडींग घेतल्याचा, वीजबिलाचा, अंतिम मुदतीचा संदेश परस्पर पाठविला जातो़ कर्मचा:याने रिडींग घेतली की तो मीटरचा फोटो महावितरणच्या अॅपमध्ये जावून अपलोड करतो़ यानंतर तत्काळ संबंधित ग्राहकाला रिंडींगचा मोबाईवर एसएमएस तसेच व्हॉटअॅपरवर संदेश पाठविला जातो़ काही हरकत असल्यास तक्रारीसाठी संदेशाच्या शेवटी टोल फ्री नंबर दिलेले असतात़ मंडळनिहाय व फिडरनिहाय कोडनुसार मोबाईल क्रमांकाची नोंदणी झाली आह़े तांत्रिक दुरूस्तीमुळे वीजपुरवठा खंडित केला जाणार असेल तर त्या परिसरातील मोबाईल नंबर नोंदणी केलेल्या सर्व ग्राहकांना आदल्या दिवशी त्याबाबतचा संदेश पाठविला जाईल़ भविष्यात नियमित भारनियमन यासह ग्राहक हिताचे निर्णय, योजनाही ग्राहकांना संदेश स्वरूपात पाठविण्याबाबत महावितरण कंपनी विचाराधीन आह़े ग्राहकांनी सेवेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल क्रमांकांची नोंदणी करावी असे, आवाहन महावितरण कंपनीतर्फे करण्यात आले आह़े