आत्माराम गायकवाडखडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकरी राजातर्फे येणाºया सणाच्या, हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतात पिकांचे नियोजन करण्यात येते. रमाजान महिन्यात अनेक शेतकरी हे शेतातून टरबूज व पपई या पिक घेण्यासाठी नियोजन करतात. मात्र लॉकडाऊनमुळे पिकाला भावच नाही. पपई चक्क कवडीमोल अर्थात तीन रुपये प्रति किलो दराने विक्री करावी लागत आहे.पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथील शेतकरी संदीप रमेश पाटील यांनी चार एकरमध्ये पपईची अडीच हजार रोपांची लागवड केली आहे. त्यांचा सात टन माल हा काढणीस योग्य झाल्याने तो सध्या कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे कवडीमोल भावात विक्री करावी लागली. सरासरीने भावाचा विचार केला तर किमान १४ ते १५ रुपये किलो दराने विक्री अपेक्षित होती. परंतु लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. व्यापारी लोक अनेक कारणे सांगून शेतकरी वर्गांकडून कवडीमोल भावात माल खरेदी करीत आहेत. मात्र हाच माल बाहेर ग्राहकांना २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री करित आहेत. यामध्ये शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.
लॉकडाऊनमुळे शेतीमाल कवडीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 3:59 PM
लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
ठळक मुद्देपपई प्रथमच तीन रुपये किलो दराने शेतकऱ्यांकडून विक्रीसरासरीने भावाचा विचार केला तर किमान १४ ते १५ रुपये किलो दराने विक्री अपेक्षित होती.