शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

वीज उपकेंद्राला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 3:22 PM

लोणपिराचे येथील प्रकार

ठळक मुद्देवीज समस्येमुळे त्रस्त शेतक:यांचा पवित्रा132 के. व्ही. वीज केंद्राची गरज

गोंडगाव ता. भडगाव, दि. 18 -  जवळच असलेल्या लोणपिराचे येथील नूतन वीज उपकेंद्राला वीज समस्येने त्रस्त झालेल्या परिसरातील शेतक:यांनी कुलूप ठोकले.  हा प्रकार 18 रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडला.याबाबत वृत्त असे की, गेल्या एक महिण्यापासून वीज पुरवठा सुरळीत  नाही. दिवसभरात आठ तासांचे लोडशेडींग आणि उर्वरित वेळेत देखील वीज फक्त अर्धा तास असते. दिवसभरात दोन तास देखील वीज शेतक:यांना मिळत नाही. अशातच निसर्गाने पाठ फिरवली असून पिके कोमजू लागली आहेत. आहे त्या पाण्याचाही पिकांना विजेअभावी वेळेत भरणा करता येत नाही. वेळोवेळी महवितरणशी याबाबत संपर्क साधूनही काही उपयोग होत नसल्याने संताप व्यक्त होत होता. सर्वच बाजुने शेक:यांना त्रास सहन  करावा लागतोय. याचा उद्रेक 18 रोजी झाला. कनाशी येथील युवासेना तालुका प्रमुख हर्षल संजय पाटील, लोणपिराचे येथील सरपंच विजय सुधाकर पाटील, गोविंद रघुनाथ पाटील सुरेश पांडूरंग पाटील, राजेंद्र सदा पाटील, अशोक  रामभाऊ पाटील, अभिमन पाटील, मधुकर पाटील, बोरनार सरपंच पी. डी. माळी, पोलीस पाटील प्रभाकर पाटील, उत्तम  पुना महाजन, सचिन रविंद्र भोपे, भाऊसाहेब पांडुरंग पाटील, घुसर्डी सरपंच ज्ञानेश्वर ओंकार पाटील यांच्यासह परिसरातील शेतक:यांनी वीज उपकेंद्राला कुलूप ठोकले. चाळीसगावहून लोणपिराचे वीज केंद्राला वीज जोडणी केली आहे. परंतु  कजगाव ते लोणपिराचे दरम्यान वारंवार तार तुटून जात होता. त्यामुळे हा प्रश्न उद्भवला. मी तात्काळ कोळगाव उपवीज केंद्रावरुन वीज जोडण्यास सांगितले आणि जोडलीही गेली. - किशोर पाटील, आमदारवीज पुरवठा अनियमीत आहे. पाहिजे त्या प्रमाणात वीज पुरवठा होत नाही. लोडशेडींग वेळेव्यतीरीक्तही वीज खंडीत होते. महावितरण याबाबत उडवाउडवीचे उत्तरे देते. -विजय पाटील, सरपंच लोणपिराचे पाऊस पडत नसल्याने ब:याचशा शेतक:यांच्या मोटर चालू असतात. लोणपिराचे येथे 132 के. व्ही. व्होल्टचे वीज केंद्र नसल्याने परिपूर्ण लोड उचलला जात नाही. यामुळे हा प्रश्न उद्भवतो. परंतु सध्या कोळगाव वीज केंद्रावरुन हा प्रश्न मार्गी लावला आहे. - विजय पवार, सहायक अभियंता, कोळगाव