शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

बोदवड पंचायत समितीला सत्ताधारी भाजपाने ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 5:03 PM

गटविकास अधिकारी येत नसल्याने व नागरिकांचे काम खोळंबत असल्याचे संताप

ठळक मुद्देगटविकास अधिकारी आठवड्यापासून रजेवर४५ पैकी १८ जागा आहेत रिक्तनऊ कर्मचारी शासकीय कामासाठी बाहेरगावी, तर केवळ सतराच कर्मचारी होते कार्यालयात हजर

बोदवड, जि.जळगाव : गटविकास अधिकारी येत नसल्याने जनतेची कामे खोळंबली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजपाच्या पंचायत समिती सभापती गणेश पाटील यांच्यासह सदस्यांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले.तालुक्यातील ५२ खेड्यांचा कारभार पाहणाऱ्या बोदवड पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी येत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबत आहेत. तसेच अनेकांचे रोजगार हमी योजनेंतर्गत अनुदान लटकलेले आहे. नागरिकांची पायपीट होत असताना, ३९ ग्रुप ग्रामपंचायतीचा कारभार १२ ग्रामसेवकांवर चालत असहे. या समस्येबाबत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्रव्यवहार करूनही लक्ष देत नाहीत.बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्या वर्षा रामदास पाटील, पंचायत समिती सभापती गणेश पाटील, उपसभापती दीपाली राणे, पंचायत समिती सदस्य किशोर गायकवाड, बाजार समिती संचालक रामदास पाटील, भाजपा प्रवक्ते अनिल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष भागवत टिकारे यांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले.या वेळी बोदवड पंचायत समितीच्या एकूण ४३ कर्मचाºयांपैकी १८ जागा रिक्त आहेत. नऊ कर्मचारी शासकीय कामासाठी बाहेरगावी होते, एक कर्मचारी रजेवर होता, तर गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे हे वैद्यकीय रजेवर होते, आज १७ कर्मचारी हजर होते.गटविकास अधिकारी सात दिवसांपासून रजेवरपंचायत समितीचे गटविकास अधिकारी ६ सप्टेंबरपासून वैद्यकीय रजेवर आहेत. यामुळे याबाबत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही, तर सभापती गणेश पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता पंचायत समितीच्या एक अभियंत्याच्या गैरकारभाराबाबत तक्रार दिली आहे. तसेच गटविकास अधिकारी येत नसल्याने पत्रही पाठवले असून दोन्ही पत्रांची दखल घेतली जात नसल्याने व नागरिकांची कामे होत नसल्याने आज पंचायत समितीला कुलूप ठोकले.याबाबत कार्यालय अधीक्षक दिनेश झोपे यांची प्रतिक्रिया घेतली असता आम्ही हजर आहेत, पण इतर वरिष्ठ अधिकारी येत नसल्याने तुमच्यावर रोष असल्याने कुलूप ठोकल्याचे सांगितले. 

टॅग्स :GovernmentसरकारBodwadबोदवड