लोहारा, ता.पाचोरा, जि.जळगाव : येथील सरपंच आशा चौधरी यांचे सरपंचपद तिसºया अपत्याच्या कारणाने रद्द झाल्याने या रिक्त जागेवर नवीन सरपंच निवडीसाठी २६ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा आयोजित केली आहे. त्या दृष्टीने येथे जोरदार हालचाली सुरू आहेत .येथील ग्रामपंचायतीचे एकूण १७ सदस्य आहेत. त्यापैकी ११ सदस्य भाजपचे कैलास चौधरी यांच्या गटाकडे आहेत, तर सहा सदस्य अक्षय जैसवाल यांच्या गटाचे असल्याने सरपंच हा कैलास चौधरी यांच्याच गटाचा होईल, असे आजतरी दिसून येते. मात्र नेमकी सरपंच पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.सध्या तरी कैलास चौधरी गटाकडून योगिता सुनील क्षीरसागर यांचे नाव चर्चिले जात असले तरी ऐन वेळी मालती संजय पाटील किंवा सीमा चंद्रकांत पाटील यांच्यापैकी एकीचे नावदेखील सरपंच पदाकरता पुढे केले जाऊ शकते.सरपंच पदाच्या निवडीसंदर्भात सभासदांना विशेष सभेचा अजेंडा प्राप्त होताच कैलास चौधरी गटाचे बहुतांश सदस्य सहलीवर गेले आहेत. जैसवाल गटाचे सदस्य गावातच असल्याचे दिसून येत आहे.सध्या येथील सरपंच पद तिसºया अपत्याच्या कारणाने रिक्त झाले आहे तर उपसरपंच अक्षय जैसवाल यांच्याविरोधत अविश्वास ठराव मंजूर झाल्याने हे पददेखील रिक्त आहे. यामुळे सध्या येथे प्रशासक राजवट आहे.
पाचोरा तालुक्यातील लोहारा सरपंच निवड २६ रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 2:58 PM
लोहारा येथील सरपंच निवडीसाठी २६ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा आयोजित केली आहे.
ठळक मुद्देसरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीवतिसऱ्या अपत्याच्या कारणामुळे रिक्त झालेय सरपंचपद