जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने राजकीय पक्ष व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचार, प्रसिद्धीवर लक्ष ठेवण्यासाठी मीडिया कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाची उमेदवारांच्या बारीक-बारीक हालचालींवर नजर आहे. याच कक्षाच्या निरीक्षणातून आतापर्यंत सात जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.निवडणूक लढविणाºया प्रत्येक राजकीय पक्ष व इतरही निवडणूक लढविणाºया उमेदवारांनी निवडणुकीसंदर्भात प्रचारासाठी एसएमएस, जाहिरात व इतर प्रसिद्धीबाबत माध्यम प्रामाणिकरण आणि सनियंत्रण समितीची (एमसीएमसी) पूर्व परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे या समितीचे अध्यक्ष असून जिल्हा माहिती अधिकारी डॉ. विलास बोडके हे सचिव आहेत. त्यांच्याच नियंत्रणाखाली मीडिया कक्षाचे काम सुरू असून या कक्षातूनच राजकीय पक्ष, उमेदवारांना प्रचार साहित्य प्रसारीत, प्रकाशित करण्यापूर्वी तपासून घ्यावे लागत आहे.या कक्षाच्या माध्यमातून वृत्तपत्रातील जाहिराती, दृकश्राव्य (आॅडिओ, व्हिडिओ) तसेच सोशल मीडियावरील जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सतत चोवीस तास कक्षाचे १५ कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. या सोबतच मीडिया कक्षातील तज्ज्ञांकडून सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यात येत आहे.आक्षेपार्ह मजकूरला आळाकोणत्याही उमेदवाराने जाहिरात करीत असताना त्यातून धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही, वैयक्तिक आरोप होणार नाही, कोणाची बदनामी होईल अशा आक्षेपार्ह मजकुरासह काही अप्रिय घटना, तणाव निर्माण होणार नाही यासाठी अशा मजकुरास आळा घालण्यात येत आहे. इतकेच नव्हे समितीला एखादी मजकूर नाकारण्याचा अधिकार आहे.अर्ज भरुन घेत दक्षताउमेदवार प्रसारीत करणार असलेल्या मजकुरासाठी मीडिया कक्षात नमुना ‘क’चा अर्ज भरुन घेतला जात असून त्यात संबंधित स्क्रीप्ट कोठे वाजविणार आहे याची माहिती घेतली जात आहे. एखाद्या उमेदवाराने संबंधित मजकूर या ठिकाणाहून प्रमाणिकरण करून घेतलेला नसल्यास नोटीस बजावली जाते.आतापर्यंत सात जणांना नोटीससोशल मीडियावर विनापरवानगी जाहिरात केल्याबद्दल जळगाव व रावेर मतदार संघातील सात उमेदवारांना नोटीस बजावल्या आहेत. यात जळगाव मतदार संघातील चार व रावेर मतदार संघातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. या सातही जणांनी परवानगी न घेता सोशल मीडियावर जाहिरात केल्याचे समितीच्या निदर्शनास आले होते. ही बाब मीडिया कक्षाने तत्काळ निवडणूक निर्णय अधिकाकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.या सोबतच उमेदवारांच्या खर्चावरदेखील कक्ष लक्ष ठेवून असून प्रसारीत मजुकाराबाबतनिवडणूकखर्चशाखेसमाहितीदेतआहे.या वेळी सोशल मीडियाचाही समावेशनिवडणुकीसंदर्भात प्रचारासाठी जाहिरात व इतर मजकूर प्रसिद्धीबाबत माध्यम प्रामाणिकरण आणि सनियंत्रण समितीची (एमसीएमसी) पूर्व परवानगी घेणे आवश्यक असण्यासह तो मजकूर प्रसिद्ध होणाºया आकाशवाणी, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांवर मीडिया कक्षाची नजर असायची. मात्र या वेळी त्यात सोशल मीडियाचाही समावेश करण्यात आला असून सोशल मीडिया, वेबसाईट, स्थानिक वृत्तवाहिन्यांवरदेखील मीडिया कक्ष लक्ष ठेवून आहे.
Lok Sabha Election 2019 : उमेदवारांच्या खर्चासह प्रचार, प्रसिद्धीवर मीडिया कक्षाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:19 PM