धुळे/नंदुरबार : माघारीच्या शेवटच्या दिवशी धुळ्यात ४ तर नंदुरबारमध्ये २ उमेदवारांनी माघार घेतल्याने धुळ्यात २८ तर नंदुरबारमध्ये ११ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना लगेचच चिन्हवाटपही करण्यात आले. नंदुरबारचे सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक संजय अपरांती हे धुळ्यातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर धुळे मतदारसंघातच सुभाष भामरे नावाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत.धुळे व नंदुरबारमध्ये मुख्य लढत काँग्रेस महाआघाडी, भाजप महायुती आणि भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार अनुक्रमे आमदार अनिल गोटे व डॉ.सुहास नटावदकर यांच्यात राहणार आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी १४ उमेदवारांनी एकुण २४ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत आमदार डॉ.विजयकुमार गावीत, डॉ.सुहास नटावदकर यांनी भाजपतर्फे भरलेले अर्ज ए.बी. फॉर्म नसल्याने फेटाळण्यात आले होते. त्यामुळे १३ उमेदवारांचे १३ अर्ज शिल्लक होते.माघारीच्या शेवटच्या मुदतीत अपक्ष हेमलता कागडा पाडवी व भरत जाल्या पावरा यांनी अर्ज माघार घेतला. त्यामुळे ११ उमेदवार रिंगणात उरले आहेत.माघारीनंतरचे चित्र : सुभाष भामरे नावाचे दोन उमेदवारनंदुरबारमध्ये रिंगणातील उमेदवाररिंगणातील उमेदवारांमध्ये काँग्रेस महाआघाडीतर्फे अॅड.के.सी.पाडवी, भाजप महायुतीतर्फे डॉ.हिना विजयकुमार गावीत, भाजप बंडखोर अपक्ष डॉ.सुहास नटावदकर, बहुजन समाज पार्टीच्या रेखा सुरेश देसाई, बहुजन वंचीत आघाडीचे सुशिल सुरेश अंतुर्लीकर, भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे कृष्णा ठोगा गावीत, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे संदीप अभिमन्यू वळवी, अपक्षांमध्ये अजय करमसिंग गावीत, अर्जूनसिंग दिवाणसिंग वसावे, अशोक दौलतसिंग पाडवी, आनंदा सुकलाल कोळी यांचा समावेश आहे.धुळ्यात रिंगणातील उमेदवारकुणाल रोहिदास पाटील -कॉंग्रेस, सुभाष रामराव भामरे -भाजप, अनिल उमराव गोटे -लोकसंग्राम, संजय यशवंत अपरांती -बहूजन समाज पार्टी, अनिल रामदास जाधव- बळीराजा पार्टी, अयुब रज्जाक तलवी -अपक्ष, सुभाष शंकर भामरे -अपक्ष, धिरज प्रकाश चोरडीया -अपक्ष, दिलीप भाईदास पाटील -बहूजन मुक्ती पार्टी, दिनेश पुनमचंद कोळी -अपक्ष, दिपक खंडू अमृतकर -अपक्ष, ज्ञानेश्वर भिमराव ढाकले- अपक्ष, हसन खान मेहराजबी -अपक्ष, इकबाल अहेमद मोहम्मदीन रफीक -अपक्ष, इरफान मो़इक्कबाल -अपक्ष, मेवती हिना युसिफ भाई भारतीय किसान पार्टी, मो़इस्माई अन्सारी भारतीय माईनोरिटीज सुरक्षा महासंघ, मोहम्मद रिजवान मोहेमुद्द अकबर अपक्ष, नबी अहेमद अहेमुद्दल्ला अपक्ष, नंदकुमार जगन्नाथ चव्हाण राष्ट्रीय जनसेवा पार्टी, नसीम खान रफिख खान- अपक्ष, नितीन बाबुराव खरे -अपक्ष, पंढरीनाथ चैत्राम मोरे-अपक्ष, जईनुद्दीन हसीन पिंजारी - बहूजन महा पार्टी, यासमिन कमल हसीम मोहम्मद आझमी -अपक्ष, सलीम कासीम पिंजारी -अपक्ष , सिताराम बावा वाघ- बहूजन रिपब्लिकन सोशललिस्ट पार्टी, ताहीर सत्तार खाटीक -राष्ट्रीय मराठा पार्टी.
Lok Sabha Election 2019 : निवृत्त पोलीस अधीक्षक धुळ्यातून निवडणूक रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 1:06 PM