जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले भाषण करतात आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे तरुणांचे आयडॉल आहेत. लोकशाहीच्या या कुंभमेळ्यात दोघांच्या नेतृत्वाचा कस लागणार असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.रेल्वे जंक्शन आणि आॅर्डनन्स फॅक्टरी यासाठी परिचित असलेल्या भुसावळ विधानसभा क्षेत्रात ‘लोकमत’ प्रतिनिधीने गरीबरथामधून प्रवास करीत प्रवाशांच्या मताचा कानोसा घेतला.पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र शासनाने एअर स्ट्राईकचा निर्णय घेतल्याने देशातील नागरिकांकडून या सरकारबद्दल अपेक्षा वाढल्याचे मत साकेगाव येथील राजू सोळंके यांनी व्यक्त केले. मोदी यांच्या चांगल्या कामाबाबत दुमत नाहीच मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील एक संधी दिली पाहिजे असे मत कुºहे पानाचे येथील जीवन चौधरी यांनी व्यक्त केले.रेल्वे आणि रस्ते मार्गाचे जाळे विस्तारले जात असताना भुसावळ रेल्वे विभागातील विविध भागातील रस्ते व वहिवाट बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. रेल्वे स्टेशन हद्दीतील झोपड पट्टीधारकांचे स्थलांतर केले असले तरी त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त झाली.जय जवान...जय किसानरस्ते, पाणी, आरोग्य या मुलभूत सुविधांसोबत आंतरराष्ट्रीय संबध, परराष्ट्र व्यवहार आणि रस्ते मार्गात देश मजबूत स्थितीत.हवामानावर आधारित पिक विम्याच्या लाभासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे.शेतकरी सक्षम करण्यासाठी व उत्पन्नातून दोन पैसे मिळावे यासाठी योजना सुरु करावी.
लोकमत आॅन द व्हील्स : मोदींचे भाषण चांगले राहुल तरुणांचे आयडॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 12:51 PM