शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘लोकमत’ची बॅट अन् नीरुच्या जल्लोषाचा सिक्सर....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 1:48 PM

कुटुंबाची आनंद सेंच्युरी

ठळक मुद्दे बालविकास मंच ठरले प्रेरणाआॅनलाईन युगात आॅफलाईन धूम

जिजाबराव वाघ/ लोकमत न्यूजनेटवर्कआॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. २५ - तो पक्का क्रिकेटवेडा...वय अवघं सात वर्ष...टॅलण्ट म्हणालं तर पठ्ठयाची पाचशेहून अधिक क्रिकेटपटूंची नाव तोंडपाठ... शत्रू पक्षाच्या चिंधड्या करणारा विराट कोहली त्याचा आवडता खेळाडू...गेल्या आठवड्यात लोकमत बालविकास मंचच्या सोडतीत त्याला बॅट बक्षिस मिळाली आणि नीरज खंडाळेसह त्याच्या कुटूंबियांनी जल्लोषाचा सिक्सर ठोकून मित्रांसमवेत आनंदाची सेंच्युरीही एन्जॉय केली. यासाठी निमित्त ठरली लोकमत बालविकास मंचची दैदीप्यमान प्रेरणा.कळमडू माध्यमिक विद्यालयातील शिक्षक प्रसन्न आणि सायगाव माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका जयश्री खंडाळे यांच्या चाळीसगाव येथील गुडशेफर्ड विद्यालयात दुसरीत शिकणा-या सात वर्षीय नीरज याला लोकमत बालविकास मंचच्या सोडतीत बॅट बक्षिस मिळाल्यानंतर या कुटूंबाने मित्र आणि नातेवाईकांसोबत केलेल्या धमालीची ही छोटीशी परंतू डोंगराएवढी गोष्ट. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास...'बॅट पाचशे रुपयांची अन् आनंद पाचशे मिलियन एवढा मोठ्ठा...'लोकमत, क्रिकेट आणि मॅचखंडाळे कुटूंबिय लोकमतचे वाचक. मध्यमवर्गीय. दोघेही शिक्षक असल्याने मुलांना अवांतर ज्ञानासाठी त्यांनी वर्तमान पत्र वाचण्याची गोडी लावली. पाचवीत शिकणारी नीरजची बहीण प्रांजलला देखील लोकमतच आवडतो. बालविकास मंचच्या उपक्रमात हे भावंड नेहमी सहभागी होतात. नीरजला क्रिकेटचंही भारी वेड आहे. अभ्यास उरकला की, तो टीव्हीसमोर बसतो ते क्रिकेटच्या मॅच पाहण्यासाठी. एरवी बॅट सोबत त्याची घराच्या अंगणात गट्टी जमते. नीरज आत्तापासूनच म्हणतो. मला क्रिकेटर व्हायचयं. म्हणूनच बॅट बक्षिससाठी नीरजचं नाव छापून आल्याचं खडाळे पती - पत्नीला मोठं अप्रुप आहे. याला योगायोग, नशीब की आशीर्वाद म्हणावं. हा गुंता त्यांच्या मनात असतांनाही त्यांनी याचे स्वागत केले ते दिल से.नाव आले...'पार्टी तो बनती है'गेल्या आठवड्यात बालविकास मंचच्या सोडतीत क्रिकेट विभागात नीरजला बॅटचे बक्षिस लागल्याची बातमी प्रसिद्ध झाली. मुलाचे नाव लोकमतमध्ये आलयं म्हटल्यावर खंडाळे परिवारात आनंदाला उधाणच आले. नातेवाई, मित्र, शेजारी, शाळेतील शिक्षक सहकारी यांच्या अभिनंदनाचे भ्रमणध्वनी खणखणले. नीरजनेही बॅट बक्षिस मिळतेयं म्हणून एकच कल्ला केला. घरात चहा - पोहे अशी पार्टी रंगली. शाळेतील सहका-यांनीही खंडाळे दाम्पत्यांकडून पार्टी तो बनती है...म्हणत आनंद आणि अभिनंदनाचे चार क्षण साजरे केले. यात शेजारचे देखील मागे नव्हते. त्यांनीही नीरजच्या गालावर गोड चिमटा काढीत हास्यकल्लोळात पार्टीत ताव मारला. अगदी मामा - मामी, काका - काकु आणि आजोबा - आजी यांनीही नीरजचे नाव वर्तमानपत्रात छापून आले म्हणून कौतुक केले. प्रांजल आणि नीरजच्या मित्र असणा-या बच्चे कंपनीने आईसस्क्रिमचा फडशा पाडला.बॅट सोबतचा फोटो पोस्टनीरजने बक्षिस मिळालेल्या ब?टसह क्रिकेटपटुच्या वेषात फोटो काढला. एका हातात ब?ट आणि दुस-या हातात हेल्मेट घेऊन त्याने शतक झळकविल्यानंतर जशी पोझ क्रिकेटपटू मैदानावर देतात. त्याच स्टाईल मध्ये नीरज आई - वडिल आणि नातेवाईकांच्या फेसबुक, व्हाटसअपसह डीपी वरही झळकला आहे.आॅनलाईन युगात आॅफलाईन धूमफेसबुकी आॅनलाईन ट्रेंड असल्याने माणसामाणसातील संवाद हरवलायं. सेल्फीचे वेड, व्हाट्सअपचा नादच खुळा असतांना लोकमतने जणू संवादाचा सेतू उभारुन मनांचे दरवाजे किलकिले केले. खंडाळे कुटूंबियांखडे रंगलेल्या मैफिलीत संस्काराचा मोती ठरलेला लोकमत देखील मिलेनियम तेजाने झळाळून निघाला.सक्षम आणि ज्ञान समृद्धी पिढी घडविण्यात 'लोकमत'चे श्रेय शब्दांतीत आहे. आम्ही मुलांना घविण्यासाठी लोकमतचेही बोट धरलेयं. बालविकास मंच ही व्यक्तिमत्व घडविणारी कार्यशाळाच आहे. आमच्या मुलांनाच नव्हे तर शाळेतील विद्यार्थ्यांनाही आम्ही बालविकास मंचच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. लोकमतने हा वसा नेहमी जपावा आणि वृद्धीगंतही करावा. हीच अपेक्षा.- प्रसन्न आणि जयश्री खंडाळे, नीरजचे आई - वडील, चाळीसगाव.

टॅग्स :JalgaonजळगावCricketक्रिकेट