शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

लोकमत रिअ‍ॅलिटी चेक : आदेश धाब्यावर बसवून खासगी रुग्णालयांकडून शुल्क आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:04 PM

कोविड उपचार : प्रत्येक रुग्णालयात वेगळे दर, रुग्णालये शासनाच्या नियंत्रणाबाहेरच

आनंद सुरवाडे ।जळगाव : कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देऊन त्यांची दर निश्चिती शासनाने केली असून याबाबत २१ मे रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर सूचनाही जारी केल्या आहेत़ मात्र, या सूचना व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसून खासगी रुग्णालयांकडून शुल्क आकारले जात असून हे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिअ‍ॅलिटी चेक’ मध्ये समोर आले आहे़दोन रुग्णालयांची बिले‘लोकमत’ कडे दोन रुग्णालयाची बिले आली आहेत़ एका रुग्णालयाने तर चक्क कागदावरच लिहून दिले आहे़ यानुसार साधारण कक्षाचे एका रुग्णालयाने ८ हजार रूपये प्रति दिवस शुल्क आकारले आहे तर दुसºया रुग्णालयाने दहा हजार आकारले आहे़ यात या रुग्णालयांनी नोंदणी म्हणून प्रत्येकी हजार रुपये आकारले.जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेशदेयकांच्या लेखापरिक्षणासाठी अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यानुसार ४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश पारित केले आहे़ त्यानुसार आरोग्य विभागाच्या अधिसूचनेनुसार रुग्णालयाच्या एकूण बेडपैकी ८० टक्के बेड कोविडचे असतील़ त्यासाठी शासनाने ठरवून दिलेले दर असतील़ पथकांनी कोविड, नॉन कोविड रुग्णांकडून आकारण्यात येणाºया देयकांचे स्वतंत्र पद्धतीने तक्रारीनुसार लेखापरीक्षण करावे़ दर दिवशी डिस्चार्ज होणाºया दहा टक्के रुग्णांच्या देयकांचे लेखापरीक्षण करण्यात यावे.साहित्याची वेगळी आकारणीपीपीई किटसारखे साहित्य जे एकापेक्षा अधिक रुग्णांना एकच वापरावे लागत असतील तर त्यांची फी ही विभागून घ्यावी, असे शासनाच्या आदेशात स्पष्ट म्हटल असताना नुकतेच एका खासगी रुग्णालयाने २ हजार रूपये प्रति किट या प्रमाणे २० किटचे ४० हजार रुपये एका रुग्णाकडून आकारले़ याबाबत तक्रारही करण्यात आली होती़ एका खासगी रुग्णालयात विचारणा केली असता पीपीई किटचे वेगळे चार्जेस द्यावेच लागतील असे सांगण्यात आले़दोन रुग्णालये वगळलीजिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील १२ रुग्णालयांना अशा उपचारांना परवानगी दिलेली आहे. यात जळगाव शहरातील सात, अमळनेर चार आणि पाचोरा येथील एका रुग्णालयाा समावेश आहे.४ आॅगस्ट रोजी काढलेल्या आदेशात या रुग्णालयांचा उल्लेख आहे़ मात्र, यातील दोन रुग्णालयाशी संपर्क साधला असता आमचे रुग्णालय हे आता नॉन कोविड असून कोविड मधून वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे जिल्हयात दहाच रु ग्णालयांमध्ये कोविडसाठी उपचार होत आहेत. ही दो़न्ही रुग्णालये जळगाव शहरातील आहे. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव