जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघाच्या निर्मितीनंतर व पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये खासदार रक्षा खडसे यांनी तब्बल तीन लाख १७ हजार ७९३ मतांनी विजयी होण्याचा विक्रम २०१४ मध्ये प्रस्थापित केला आहे. १९७१ मध्ये खासदार कृष्णराव पाटील यांच्या एक लाख २७ हजार ९६९ मतांचा विक्रम त्यांनी मोडीत काढला आहे. या निवडणुकीत विजयाचा हा विक्रम मोडित निघतो की कायम राहतो याबाबत उत्सुकता आहे. १९७१ मध्ये कृष्णराव पाटील यांनी गजाननराव गरुड यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये रक्षा खडसे यांनी मनिष जैन यांचा पराभव केला.3,17,793 एवढ्या मताधिक्याने खासदार रक्षा खडसे यांनी २०१४ मध्ये विजय मिळाला होता. त्यावेळी त्यांना ६,०५,०६४ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे मनिष जैन उभे होते आणि त्यांना २,८७,२७१ मते मिळाली होती. खडसे यांचा हा रेकॉर्ड कायम आहेत.कोणाला किती होते मताधिक्यवर्ष नाव मताधिक्य1952 शिवराम राणे 683261957 भरुचा कुरेसेटजी 247021962 जुलालसिंग पाटील 703851967 एस.एस.सामदळी 660811971 कृष्णराव पाटील 1279691977 वाय.एम.बोरोले 121861980 वाय.एस.महाजन 963581984 वाय.एस.महाजन 540651989 यादव शिवराम महाजन 54361991 डॉ.गुणवंत सरोदे 239551996 डॉ.गुणवंत सरोदे 840871998 डॉ.उल्हास पाटील 568141999 वाय.जी.महाजन 897952004 वाय.जी.महाजन 206462007 हरिभाऊ जावळे 257172009 हरिभाऊ जावळे 282182014 रक्षा खडसे 317793
Lok Sabha Election 2019 : लोकमत रिसर्च - रक्षा खडसे यांचा तीन लाखावर मतांचा रेकॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:12 PM