शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

रामेदववाडीत मतदानावर बहिष्कार; वसंतवाडीकरही मतदानाला गेले नाहीत

By सुनील पाटील | Published: May 13, 2024 2:03 PM

गेल्या आठवड्यात ७ मे रोजी रामदेववाडी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला उडविल्याने त्यात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण संशयितांना अटक केली नाही.

जळगाव : गेल्या आठवड्यात रामदेववाडीनजीक झालेल्या अपघातात दोन चिमुरड्यांसह माता व भाचा अशा चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा रोष रामदेववाडी व वसंतवाडी या दोन गावातील लोकांमध्ये आजही कायम असून नागरिकांनी थेट मतदानावरच बहिष्कार टाकला. दोन्ही गावांमध्ये सकाळपासून बूथ लागले, पण एकही मतदार मतदानासाठी घरातून बाहेर पडला नाही. वडली, ता.जळगाव येथे जीवंत व्यक्तींना मतदार यादीत मयत दाखविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. ‘लोकमत’ प्रतिनिधीने ग्रामीण भागातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या असता हे प्रकार निदर्शनास आले.

गेल्या आठवड्यात ७ मे रोजी रामदेववाडी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला उडविल्याने त्यात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण संशयितांना अटक केली नाही. मंत्र्यांनी वेळ मारुन नेली. आमच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर रोष व्यक्त केला. आताच नाही तर पुढे विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीलाही मतदान करणार नाहीत, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. गावातील वातावरण पाहता मतदान केंद्रावर दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. 

वडलीत दोन माजी सरपंचासह चौघांना दाखविले मयतवडली गावातील मतदार यादीत गोकुळ गजमल पाटील व सत्यभामा अशोक पाटील या माजी सरपंचांसह त्र्यंबक श्यामराव पाटील व जितेंद्र एकनाथ पाटील या चौघं जीवंत व्यक्तींना मयत दाखविण्यात आले आहे. त्याशिवाय मयत झालेल्यांची नावे कायम होती. नाव नोंदणी करुनही अनेक नवमतदारांची नावेच समाविष्ट झालेली नाही. बीलएओंनी या कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप रहिवाशांनी केला.