ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.22 : शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस समोरील बंद घरातून चोरटय़ांनी लॅपटॉपसह साडय़ा लांबवल्याची घटना घडली़ गेल्या काही दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा घरफोडय़ा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आह़े
फिर्यादी स्वाती चतुव्रेदी (43, रेल्वे फिल्टर हाऊससमोर, क्वार्टर नं़एम़बी़374) या मध्यप्रदेशातील मुलीसह आई-वडिलांकडे गेल्याने घराला कुलूप होत़े चोरटय़ांनी ही संधी साधत घरातील जुना पाच हजार रुपये किंमतीची लॅपटॉप तसेच तीन हजार रुपये किंमतीच्या साडय़ा लंपास केल्या़ गावातून परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे उघडकीस आल़े या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आऱटी़सोनवणे करीत आहेत़