जळगाव : विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल होणार असून गुजरातमधून गोध्रा येथून होमगार्डचे ८ अधिकारी व ४०० कर्मचारीही बोलाविण्यात आले आहेत. रविवारी दुपारी हा बंदोबस्त रवाना झाला. मुंबई, पुणे, नाशिक धुळे व गुजरात येथून बंदोबस्त मागविण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात ३६ केंद्र संवेदनशील असून ११ केंद्र एकट्या भुसावळ शहरात आहेत. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेआहेत.कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दिल्ली येथून केंद्राचा विशेष पोलीस फोर्सही मागविण्यात आला आहे. या फोर्समध्ये ११ कंपन्या असून एका कंपनीत १२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दिल्लीचे १ हजार ३२० कर्मचारी त्याशिवाय आरसीपी, सीआरपीएफ, स्ट्रायकिंग फोर्स व जिल्ह्याचा बंदोबस्त हा असणार आहे.मुंबई लोहमार्गचे कर्मचारी दाखलमुंबई लोहमार्गचे ४०० कर्मचारी व गोध्रा पंचमहल येथील ४०० होमगार्ड, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातून १० पोलीस निरीक्षक, महिला उपनिरीक्षक, प्रशिक्षणार्थी १०० महिला पोलीस दाखल झाले आहेत.
संवेदनशील केंद्रावर कॅमेऱ्यांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 1:10 PM