भुसावळ,दि.21- शहरातील गटसाधन कार्यालयाने कात टाकली असून शालेय पोषण आहार, गटसमन्वय कार्यालय व गटशिक्षणाधिकारी कार्यालयास रंगरंगोटी करण्यात आल्याने या कार्यालयाला नवा लूक प्राप्त झाला आह़े
शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे यांनी या बेरंग कार्यालयाचे चित्र बदलविण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली़ शासनाकडून कुठलीही रक्कम न घेता स्वखर्चातून तसेच मित्रांच्या व सहका:यांच्या मदतीने कार्यालयाचे रूप पालटवले आह़े कार्यालयाला भेट देणा:यांना नूतनीकरण पाहून मोठा आश्चर्याचा धक्काही बसत आह़े
‘बेटी बचाव..’ चा दिला संदेश
गटसाधन कार्यालयाचा चेहरा-मोहरा बदलल्यानंतर भेट देणा:या शिक्षकांमध्ये समाधान जाणवत आहे. हीच अवस्था गटसमन्वय कार्यालयाची होती. शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांनी या कार्याची प्रेरणा घेत कार्यालयाचे चित्र बदलविले. कार्यालयास रंगरंगोटी करुन ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा संदेश देण्यात आला. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचीसुद्धा रंगरंगोटी करण्यात आली.
बीट दोनमधील शाळा डिजिटल
शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांच्या कार्यक्षेत्रातील बीट क्रमांक दोनमधील सर्व शाळा शंभर टक्के डिजिटल झाल्या आहेत. चव्हाण यांच्या प्रय}ातून तालुक्यातील पहिली डिजिटल क्लासरुम विल्हाळे जि.प.शाळेत सुरु झाली. विल्हाळे शाळेच्या डिजिटल वर्गासाठी स्वत: चव्हाण यांनी 10 हजार रुपयांची मदत केली होती. तसेच ग्रामस्थांनासुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या प्रय}ांना यश येऊन बीट मधील सर्व शाळा या डिजीटल झाल्या असल्याचे सूत्रांनी सांगितल़े