लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा लस घेतली. त्यानंतर आधी आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रंटलाईन वर्कर आणि मग सामान्य नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ६६ हजार ७१६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. सध्या फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. मे महिन्यात सुरुवातीला १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, नंतरच्या काळात लसीकरण केंद्रांवरील गर्दी वाढली आणि लसींचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत किती टक्के लसीकरण झाले
किती डोस शिल्लक ११ टक्के
फ्रंटलाईन वर्कर्स
पहिला डोस घेतलेले ४५७२७
दोन्ही डोस घेतलेले १८८५५
प्रतीक्षेत असलेले लाभार्थी ८९३४
आरोग्य कर्मचारी ३२७५६
पहिला डोस घेतलेले २६९८४
दोन्ही डोस घेतलेले १६७०४
प्रतीक्षेत असलेले लाभार्थी - ५७७२
४५ वर्षे वयापेक्षा अधिक
पहिला डोस घेतलेले ३५००७०
दोन्ही डोस घेतलेले ८७५००
प्रतीक्षेत असलेले लाभार्थी २२५००
१८ ते ४४ वयोगट
पहिला डोस घेतलेले २०८७६
दोन्ही डोस घेतलेले ०००
प्रतीक्षेत असलेले लाभार्थी आकडेवारी उपलब्ध नाही
एकूण डोस किती आले -
एकूण लसीकरण किती झाले -
५,६६,७१६
आलेल्या डोसपेक्षा जास्त लसीकरण
सर्वत्र लस वाया जाण्याचे प्रमाण असले तरी जळगाव जिल्ह्यात आलेल्या एकूण डोसपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत जेवढे लसींचे डोस प्राप्त झाले आहेत, त्यापेक्षा अधिक म्हणजेच ५ लाख ६६ हजार ७१६ नागरिकांना लस देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात डोस शिल्लक नाही.
स्टार ७७२