शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

जीव वाचविण्याच्या धडपडीतही रुग्णांची लूट

By admin | Published: February 06, 2017 12:33 AM

गैरफायदा : खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी

जळगाव : गंभीर आजार व अपघातावेळी अत्यावश्यक व तातडीच्या उपचारासाठी जळगावातून मोठय़ा शहरात (हायर सेंटर) हलविण्याची वेळ रुग्णावर आली तर खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांची सर्रासपणे मोठय़ा प्रमाणात लूट केली जाते. वेळेला महत्त्व असल्याने त्याचा गैरफायदा घेत दीड ते दोन पट जादा भाडे वसूल करण्याचा गोरखधंदा जिल्हा रुग्णालय परिसरात मांडला असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान आढळून आले. रुग्णाची प्रकृती खालावली तर त्याला इतर शहरामध्ये हलविण्यासाठी रुग्णवाहिका चालकांकडून लूट सुरू असल्याच्या काही तक्रारी ‘लोकमत’कडे प्राप्त झाल्याने त्याची पडताळणी करण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात स्टिंग ऑपरेशन केले असता, रुग्णवाहिका चालकांकडून मोठय़ा प्रमाणात भाडे आकारण्यात येत असल्याचे आढळून आले व‘लोकमत’कडे प्राप्त झालेल्या तक्रारीत तथ्य असल्याचेही निदर्शनास आले.कोणीही असो, डिङोलचे पैसे तर द्यावे लागतीलखाजगी रुग्णवाहिका चालकांकडून लूट केली जात असतानाच एका मंत्र्यांच्या नावाने सेवा म्हणून दिल्या जाणा:या रुग्णवाहिकेसाठी देखील इंधनाचे पैसे द्यावेच लागतात. राजकीय मंडळींकडून मतदार संघातील रुग्णांच्या सेवेच्या नावाखाली रुग्णवाहिका चालविल्या जातात. यामध्ये एका मंत्र्यांच्या नावाने चालणा:या या रुग्णवाहिकेविषयी विचारणा केली असता डिङोलचे पैसे द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यातही व्हेंटीलेटर असलेली रुग्णवाहिका असल्यास जादा पैसे मोजावे लागतील, असे सांगण्यात आले. पुणे येथे जायचे असल्यास आठ ते दहा हजार रुपयांचे डिङोल लागेल व व्हेंटिलेटरची सुविधा असलेली रुग्णवाहिका असल्यास 14 ते 15 हजार रुपये लागतील, असे सांगण्यात आले. त्यात सध्या दोन दिवस रुग्णवाहिका नसल्याने दोन दिवस वाट पहावी लागेल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णसेवा व आरोग्य सेवक या बाबत केवळ गप्पा मारल्या जातात, असा अनुभव आला. एकाच ठिकाणाहून मोठी तफावतरुग्णवाहिकेतून रुग्णाला न्यायचे झाल्यास जिल्हा रुग्णालयाबाहेर एकाच रांगेत उभ्या असलेल्या, एकाच ठिकाणाहून निघणा:या रुग्णवाहिकांच्या भाडय़ात मोठी तफावत असल्याचे यावेळी दिसून आले. एका रुग्णवाहिका चालकाने औरंगाबादला जाण्यासाठी 4200 रुपये भाडे सांगितले.  थोडी तडजोड करीत अखेर तो 3800 रुपयांमध्ये तयार झाला. त्यानंतर एका रुग्णवाहिका चालकाने 3600 रुपये सांगितले. तर दुस:या एका रुग्णवाहिका चालकाने प्रथम 3200 रुपये सांगितले व त्यातही 200 रुपये कमी करू असे सांगून तो 3000 रुपयांमध्ये जाण्यास तयार झाला. वाजवी भाडे घेणे अपेक्षित असताना कोठे 3000 तर कोठे 4000 रुपयांपेक्षाही जास्त भाडे घेतले जात असल्याची तफावतही येथे दिसून आली. रुग्णाच्या नातेवाईकाच्या राहणीमाननुसार पैसे सांगितले जातात, असाही अनुभव येथे आला. एका बाजूने रिकामे यावे लागते..आपल्याकडून जादा भाडे आकारले जात असल्याची जाणीव रुग्णवाहिका चालकांना करून दिली असता, आम्हाला एकाच बाजूचे भाडे मिळते. परत येताना रिकामेच यावे लागते, त्यामुळे परवडत नाही. म्हणून एवढे भाडे आकारले जाते, असे रुग्णवाहिका चालकांचे म्हणणे होते.जिल्हा रुग्णालयात खाजगी रुग्णवाहिकांची घुसखोरी4जिल्हा रुग्णालयासमोर या खाजगी रुग्णवाहिका तर लागलेल्या असतातच. शिवाय त्या जिल्हा रुग्णालयातील वाहनतळावरदेखील लावलेल्या असतात. या ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक, अधिकारी, कर्मचारी यांची वाहने लावण्यास जागा नसताना तेथे या खाजगी रुग्णवाहिकांची घुसखोरी दिसून येते. इतर वाहने लावल्यास ती चोरीला गेल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.दीड ते दोन पट भाडेप्रचलित वाहतुकीनुसार एखादे वाहन एका दिवसात 300 कि.मी.च्यावर प्रवास करीत असेल तर त्या प्रवासाचे प्रति कि.मी. नुसार भाडे घेतले जाते. रुग्णाची प्रकृती खालावल्यास बहुतांश वेळा अशा रुग्णांना जळगावातून औरंगाबादला हलविले जाते. औरंगाबादचे परतीचे अंतर 320 कि.मी. होते. तसे पाहता सध्या साडे सहा ते सात रुपये प्रति कि.मी. प्रमाणे लहान वाहनांचे भाडे लागते. त्यामुळे औरंगाबादचे भाडे साधारण अडीच हजार रुपयांर्पयत होते. मात्र दीड ते दोन पट जादा भाडे वसूल केले जाते.