शेंदुर्णी, ता. जामनेर : येथील साईनाथ नगर भागात सोमवारी रात्री ८.३० ते ९ वाजेच्या दरम्यान बेबीबाई सोनवणे यांच्या घराला अचानक आग लागून ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. महिला व तिचा मुलगा असे दोघेच या घरात राहतात. आग लागली तेव्हा घरात कोणी नव्हते. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही. घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्यासाठी मदत केली. आगीचे कारण समजू शकले नाही. पोलीस व महसूल विभागाने पंचनामा केला.
आगीत ३० हजार रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:23 AM