भुसावळ, जि.जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांना सूट मिळावी याकरिता २० एप्रिलपासून शासनातर्फे लॉकडाऊनमध्ये शिथिलता प्रदान करण्यात आली. मात्र, गैरफायदा घेत शीतपेय, आइस्क्रीम, कुल्फी विक्री जोरात सुरू झाली आहे. दुकानांमध्ये कर्मचाऱ्यांसह दुकानदारांची गर्दी होत आहे. परिणामी पोलीस प्रशासन हतबल झाले आहे.२० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये व्यावसायिकांसाठी शिथिलता प्रदान करण्यात आली. मात्र याचा गैरफायदा घेत काही दूध डेअऱ्यांमध्ये हे चक्क दुधाच्या नावावर शीतपेय, आइस्क्रीम, कुल्फी सहज थंड पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. तसेच शहरातील व्यापारी संकुलांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची झुंबड उडाली आहे. मोठ्या दुकानांमध्ये ग्राहकांचा तर सोडाच, दुकान चालकासह ८ ते १० कर्मचारी सोशल डिस्टंिन्स्ांगचा फज्जा उडताना दिसत दिसत आहे. याशिवाय दुकानाबाहेर तोबा गर्दी होतानाचे चित्र आहे.यावल रोडवर बाजारपेठ पोलीस ठाणे व शहर पोलीस ठाणे या दोघांच्या हाकेच्या अंतरावरील किराणा दुकानात एकाच वेळेस ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. विशेष म्हणजे या मार्गावरून सतत पोलिसांची गस्त असते.कारवाईचे सत्र सुरूचगेल्या तीन-चार दिवसात भाजीपाल्याचा लिलावाचा डाव उधळून पाच लाखाची जप्तीची कारवाई करण्यात आली होती. यानंतर बांधकाम व्यावसायिकावर सातत्याने कारवाई होत आहे मात्र तरीही कोरोनाचे गांभीर्य दिसून येत नाही
नियमात शिथिलता अन् भुसावळात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 5:48 PM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांना सूट मिळावी याकरिता २० एप्रिलपासून शासनातर्फे लॉकडाऊनमध्ये शिथिलता प्रदान करण्यात आली. मात्र, गैरफायदा घेत शीतपेय, आइस्क्रीम, कुल्फी विक्री जोरात सुरू झाली आहे.
ठळक मुद्देशीतपेय, आइस्क्रीम, कुल्फीची विक्रीपोलीस प्रशासन हतबल