फैजपूर/चिनावल, जि.जळगाव : माणुसकी हरवत चालली आहे अशी नित्य ओरड होत असलेल्या वातावरणात पुन्हा एकदा माणुसकीचे व प्रामाणिकपणाचे दर्शन घडले आहे. चिनावल येथे एका नवरदेवाच्या हातातील एक तोळ्याची अंगठी लग्नाच्या दिवशी हरवली होती. खूप शोधाशोध करुनही ती सापडली नाही. त्यामुळे सगळे बेचैन झाले होते. पण नवरदेव-नवरीच्या मित्रांनी ती अंगठी त्यांच्या हवाली केली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला.सूत्रांनुसार, चिनावल, ता.रावेर येथील प्रफुल्ल डिगंबर कोल्हे या नवरदेवाची रोझोदा, ता.रावेर येथील कामसिद्ध मंदिरावर ३१ मे रोजी विवाह झाला. नवरदेव प्रफुल्ल यास आहेरामध्ये मिळालेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी नाचण्यासाठी नवरदेवाला घोड्यावरून खाली उतरवले असता लग्न मंडपाजवळ पडली. नवरदेव नवरी घरी आल्यानंतर त्यांना आपल्या बोटातली अंगठी हरवल्याचे समजले, पण इलाज नव्हता. कोणाला विचारणार आणि कोणी कोणाकडे सांगणार, अशी परिस्थिती त्यांची झाली होती.परंतु लग्नासाठी उपस्थित असलेले नवरीचे व नवरदेवाचे मित्र फैजपूर येथील भूषण भंगाळे हे जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. भंगाळे यांचा नवरदेव प्रफुल्ल यांना फोन आला की, तुमची हरवलेली अंगठी आम्हाला सापडली आहे. आम्ही तुमच्या घरपोच आणून देतो. या दोघा मित्रांनी ही हरवलेली अंगठी चिनावल येथे नवविवाहितांच्या घरी येऊन परत केली. फैजपूर येथील रहिवासी असलेले भूषण भारंबे यांनी एक तोळे सोन्याची अंगठी सापडल्याचा कोणताही स्वार्थ न करता नवविवाहित दांपत्याला परत केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल चिनावल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. तसेच नवरदेवाचे वडील दिगंबर कोल्हे यांनी भूषण भंगाळे यांचा प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्या घरी सत्कार केला. जगात प्रामाणिकपणा शिल्लक आहे याचा प्रत्यय आणून दिला, याबद्दल त्यांनी आभार मानले.
नवरदेवाची हरवलेली सोन्याची अंगठी मित्रांनी केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 7:19 PM
माणुसकी हरवत चालली आहे अशी नित्य ओरड होत असलेल्या वातावरणात पुन्हा एकदा माणुसकीचे व प्रामाणिकपणाचे दर्शन घडले आहे. चिनावल येथे एका नवरदेवाच्या हातातील एक तोळ्याची अंगठी लग्नाच्या दिवशी हरवली होती. खूप शोधाशोध करुनही ती सापडली नाही. त्यामुळे सगळे बेचैन झाले होते. पण नवरदेव-नवरीच्या मित्रांनी ती अंगठी त्यांच्या हवाली केली आहे.
ठळक मुद्देरोझोदा येथे पार पडला होता लग्न सोहळाघोड्यावरून उतरून नाचत असताना पडली होती अंगठी