लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव/धुळे/ नंदुरबार : ग्रामपंचायत निवडणुकीत खान्देशात भाजपचे वर्चस्व दिसून आले आहे. त्यांनी तीनही जिल्ह्यातील २७५ पैकी १०९ ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकाविला आहे. त्यापाठोपाठ कांँग्रेसने ९७ ग्रामपंचायतीवर बाजी मारली आहे. कॉंग्रेसचे यश हे प्रामुख्याने धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आहे तर जळगाव जिल्ह्यात मात्र भाजप- सेना चमकले आहेत. शिवसेनेने जळगाव जिल्ह्यातील ३० ग्रामपंचायतींसह एकूण ४१ ठिकाणी यश मिळविले आहे. राष्ट्रवादीची नंदुरबार जिल्ह्यात पाटी कोरी राहिली तर धुळे व जळगाव जिल्हा मिळून त्यांनी २२ ठिकाणी यश प्राप्त केले आहे. विजेत्यांमध्ये इतरांना सहा ठिकाणी विजयश्री मिळाली आहे. ३२ ग्रामपंचायतींची निवडणूक आधीच बिनविरोध पार पडली आहे.खान्देशातील २४३ ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. बहुतेक ठिकाणी तरुण रक्ताला संधी मिळाली. यानिमित्ताने गावकीच्या राजकारणात तरुणांचा प्रवेश झाला आहे. ही ग्रामपंचायत निवडणूक अनेक बड्यांना धक्का देणारी ठरली आहे. लोकनियुक्त सरपंचाची थेट निवड असल्याने या निवडणुकीत मोठीच चुरस निर्माण झाली होती.वित्त आयोगातून मिळणारा पैसा थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होत असल्याने तरुण आणि अनुभवी मंडळीही या ग्रामपंचायत निवडणुकीकडे वळली होती. तालुक्याच्या राजकारणात सक्रीय असलेले आणि मोठी पद सांभाळणाºयांना या निवडणुकीत आपली शक्ती आजमावून पाहिली इतके या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते.जळगावजळगाव जिल्ह्यात १०१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यात भाजप- शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळविल्याच दावा केला जात आहे. उमेदवारांसह समर्थकांमध्ये विजयाबाबत उत्सुकता, निकालाची हुरहुर आणि जल्लोषाचे वातावरण दिसून आले.खिरोदा ता. रावेर हे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे गाव. यात १२ जागांपैकी आठ जागा भाजपने मिळविल्या आहेत. सरपंचपदावरही भाजप उमेदवार विजयी झाला आहे. उंबरखेड ता. चाळीसगाव येथे बाजार समितीचे सभापती रवींद्र चुडामण पाटील हे पराभूत झाले. तिथे चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केदारसिंग पाटील हे सरपंच म्हणून निवडून आले. जवखेडा सिम (ता. एरंडोल) ग्रामपंचायतीवर जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले सरपंचपदासह सहा जागांवर विजय मिळविला आहे. तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांच्या पॅनलला अवघ्या ३ जागा मिळाल्या. जळगाव तालुक्यातील ११ पैकी ८ ग्रा.पं.वर शिवसेनेचा सरपंच निवडून आल्याचा दावासहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. तर ३ ग्रा.पं.च्या सरपंचपदावर भाजपाचे उमेदवार निवडून आल्याचा दावा भाजपाचे युवा मोर्चा सरचिटणीस भाऊसाहेब पाटील यांनी केला आहे. जामनेर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीत सरपंच व सदस्यपदासाठी भाजपाचे कार्यकर्ते विजयी झालेले आहेत. ंंअसा दावा नगराध्यक्षा साधना महाजन यांनी केला आहे.धुळेजिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. साक्री तालुक्यातील कासारे सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेना तालुकाध्यक्ष विशाल देसले यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप काकुस्ते पराभूत झाले आहे. तर आमदार डी.एस.अहिरे यांच्या पत्नी मात्र कुडाशी सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.धुळे तालुक्यातील नगाव सरपंच निवडणुकीत माजी आमदार द.वा.पाटील यांच्या सून ज्ञानज्योती भदाणे या विजयी झाल्या. त्यांनी आपल्या सासू सुशीलाबाई भदाणे यांचा पराभव केला. याठिकाणी मनोहर भदाणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रणित पॅनलने सर्व जागांवर विजयी मिळविला. शिरपूर तालुक्यात बोराडी येथून भाजप प्रणित राहुल रंधे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने बहुमत मिळविले. सरपंचपदी त्यांच्या पॅनलचा उमेदवार विजयी झाला.नरडाणा ग्रामपंचायतीत भाजपाच्या संजीवनी सिसोदे यांच्या पॅनलने सरपंच पदावर विजयी मिळविला असला तरी त्यांचे चिरंजीव दोन जागेवरुन तर अन्य ठिकाणाहूनही त्यांचे पॅनलचे उमेदवार पराभूत झाले आहे.नंदुरबारात भाजपाचीच बाजी४प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या ५१ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर करण्यात आले़ भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. नंदुरबार तालुक्यात १६, नवापूर १२, अक्कलकुवा १५, तळोदा एक तर शहादा तालुक्यात सात ग्रामपंचायतीत निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या़ यामुळे ४२ ग्रामपंचायतीसाठी गेल्या शनिवारी ६८ टक्के मतदान होते़४लोकनियुक्त सरपंच निवडीचा उत्साह असल्याने पाचही तालुक्यात भरघोस मतदान झाले होते़ सोमवारी निकाल घोषित झाल्यानंतर मात्र अनेकांची निराशा तर अनेकांच्या चेहºयावर आनंद पसरला़ नंदुरबार तालुक्यात आठ काँग्रेस, एक शिवसेना सात ग्रामपंचायतींवर भाजपाचे उमेदवार निवडून आले़ नवापूर तालुक्यात काँग्रेसने आठ तर राष्ट्रवादी काँग्रेसने चार ठिकाणी यश मिळवले़४तळोदा तालुक्यात एकमेव ग्रामपंचायत काँग्रेस तर शहादा तालुक्यातील चार भाजपा, एक लाल बावटा आणि दोन ठिकाणी ठिकाणी काँग्रेसने दावा केला आहे़ जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक १० ग्रामपंचायतींवर भाजपा, चार काँग्रेस तर एके ठिकाणी शिवसेनेने दावा केला आहे़जिल्हानिहाय अंतिम निकालपक्ष नंदुरबार धुळे जळगावभाजपा ३० २२ ५७सेना ०२ ०९ ३०काँग्रेस १७ ७१ ०९राष्ट्रवादी ०० ०६ १६इतर ०२ ०० ०४एकूण ५१ १०८ ११६
ग्रामपंचायतीतही फुलले कमळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 1:08 AM
जळगाव/धुळे/ नंदुरबार : अनेक बड्यांना धक्का, सरपंच निवडीमुळे मोठीच चुरस, काँग्रेस दुसºया स्थानी
ठळक मुद्दे१०९ ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडाकांँग्रेसची ९७ ग्रामपंचायतीवर बाजीशिवसेना राहिली तिसºया स्थानी