जळगाव : भरारी फाउंडेशन व के.के.कॅन्सने कोरोनात आई-वडील गमावलेल्या १४ बालकांना आर्थिक, शैक्षणिक व अत्यावश्यक साहित्यांची मदत करून मायेचा आधार दिला आहे. पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
जळगाव जिल्ह्यातील १८ वर्षांखालील १४ मुला-मुलींना ७० हजारांची मदत करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, रजनीकांत कोठारी, नंदू अडवाणी, बाळासाहेब सूर्यवंशी, डॉ.प्रीती दोशी, गृहशाखेचे उपअधीक्षक भास्कर ढेरे, महिला बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी हे उपस्थित होते.
उपक्रमासाठी दलिचंद जैन, रजनीकांत कोठारी, नंदू अडवाणी, विजय जोशी, डॉ.रुपेश पाटील, मुकेश हासवानी, चंदन तोष्णीवाल, पवन जैन, जय दोशी, अजिंक्य देसाई, विनोद बडगुजर, स्वप्निल वाघ यांनी सहकार्य केले.
कोरोना काळात ज्यांनी आपले आई-वडील दोन्ही गमावले असे जिल्ह्यात १८ वर्षांखालील २० मुले-मुली आहेत. ज्यांची परिस्थिती फारच हलाखीची आहे, अशा १४ मुला-मुलींना प्रत्येकी ५ हजारांची मदत एकूण ७० हजार रोख व शैक्षणिक साहित्य तसेच किराणाचे कीट कार्यक्रमात देण्यात आले.
यशस्वीतेसाठी सचिन महाजन, नीलेश झोपे, दीपक विधाते, आकाश धनगर, नीलेश जैन, दुर्गेश आंबेकर, रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, चेतन वाणी, स्वप्निल वाघ यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले तर प्रास्ताविक भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी यांनी केले.
फोटो : २८ सीटीआर ४६
फोटो कॅप्शन : गरजू मुलांना साहित्य वाटपाप्रसंगी रजनीकांत कोठारी, डाॅ.प्रवीण मुंढे, नंदू अडवाणी, भास्कर ढेरे, विजयसिंग परदेशी, दीपक परदेशी आदी.