यावल : आदिवासी विकास विभागाच्या खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळवून देतो, अशी बतावणी करून काही व्यक्ती, संघटना लाभार्र्थींकडून पैसे घेत असल्याचे प्रकल्प कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे पाटील यांनी केले आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे पुनरुज्जीवन राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या ९ सप्टेंबर २०२० रोजीच्या निर्णयाने केले आहे.खावटी अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना लाभ घेण्यासाठी लाभार्र्थींनी करावयाचे अर्ज, पोचपावती, नोंदवह्या आदी बाबींचे नमुने तयार केले. तथापि, असे निर्दशनास आले आहे की, काही संघटना, व्यक्ती आदिवासी बांधवांकडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण लाभार्र्थींना करीत आहेत. ही बाब बेकायदेशीर असल्याने अशा तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्र्थींनी अर्ज प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आमिषाला अथवा गैरप्रकाराला बळी न पडता खावटी अनुदान योजनेबाबत अधिकची माहिती प्राप्त करण्यासाठी उपप्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महांमडळ, उपप्रादेशिक कार्यालय, यावल, जि.जळगाव आणि प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी केले आहे.
खावटी अनुदानासाठी विद्यार्थ्यांना आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:07 IST
आदिवासी विकास विभागाच्या खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळवून देतो, अशी बतावणी करून काही व्यक्ती, संघटना लाभार्र्थींकडून पैसे घेत असल्याचे प्रकल्प कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे.
खावटी अनुदानासाठी विद्यार्थ्यांना आमिष
ठळक मुद्देबळी पडू नकाप्रकल्प अधिकाऱ्यांचे आवाहन