कोरोनामुळे वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांवर महावितरणतर्फे जोरदार कारवाई मोहीम राबविण्यात येत असून, आता मोठी थकबाकी असलेल्या विविध शासकीय कार्यालयांवरही लवकरच कारवाई मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकीदार म्हणून जळगाव महापालिका नंबर एकवर असून, तब्बल नऊ कोंटीची वाघूर पाणीपुरवठा वीज बिलाची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्याबाबत महावितरण प्रशासनातर्फे दर महिन्याला मनपा प्रशासनाला नोटीस बजाविण्यात येत आहे. आतापर्यंत सात ते आठवेळा नोटीस बजावण्यात आली असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. विशेष म्हणजे वीजबिलाबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यानींही अनेकदा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली. मात्र, मनपाकडून थकबाकी भरण्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात येत नसल्यामुळे, आता महावितरणनेच वाघूर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्फो :
हप्त्याने मनपाला वीज बिल भरण्याची सवलत
महापालिकेने महावितरणची थकबाकी भरण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही आयुक्तांनी भेट घेऊन, त्यांना हप्त्याने वीज बिल भरण्याची सवलत दिली आहे. यामुळे मनपाला तीन हप्त्यात नऊ कोटींपर्यंतचे बिल भरता येणार आहे. मात्र, ही सवलत देऊनही मनपाने वीज बिल न भरल्यामुळे, महावितरणने इतर ग्राहकांप्रमाणे मनपाच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्फो :
जळगाव मनपाकडे महावितरणची नऊ कोटींच्या घरात थकबाकी जमा झाली आहे. थकबाकी भरण्याबाबत अनेकदा महावितरणने नोटिसा बजाविल्या, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यानी आयुक्तांचींही भेट घेतली. मात्र, तरीही थकबाकी भरण्यात येत नसल्यामुळे, मनपाला अंतिम नोटीस पाठविली आहे. आठवडाभरात थकबाकी न भरल्यास नियमानुसार वाघूरचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
-फारुख शेख, अधीक्षक अभियंता, महावितरण