शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले
2
शरद पवार, मराठा कार्ड; छगन भुजबळांच्या येवल्यात राजकीय समीकरणं काय?
3
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या कन्येचा विवाहसोहळा; दोन राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री उपस्थित
4
पुतण्यानेच केली काका, काकू आणि ३ भावंडांची हत्या; १९९७ मधील 'त्या' घटनेचा घेतला बदला
5
"माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, हे माझा काय मुकाबला करणार", अब्दुल सत्तारांचे विधान
6
“देवेंद्र फडणवीसांची क्षमता पाहा, भाजपाला मतदान करु पण तुतारीला नाही”: लक्ष्मण हाके
7
"...तेव्हा 'मातोश्री'वर राज ठाकरेंनी केलेले फोन उचलले नाहीत; कुठे होता कुटुंबप्रमुख?"
8
“फडणवीसांनी माझे नाव घेऊ नये, मनोज जरांगेंचे घ्यावे, मराठा आरक्षणावर बोलावे”; ओवेसींचे आव्हान
9
इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या तरी कलम 370 परत येणार नाही, अमित शाहांची गर्जना
10
१७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी पार्कवर घुमणार 'राज'गर्जना; मनसेला मिळाली परवानगी
11
अनिल अंबानींच्या कंपनीला ₹२८७८ कोटींचा नफा; यापूर्वी तोट्यात होती कंपनी; ₹३६ वर आला शेअर
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: शिराळ्यामध्ये निष्ठावंत गटांची सत्त्वपरीक्षा
13
नितीश कुमार पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले, पंतप्रधान मोदी तत्काळ खुर्चीवरून उठले अन्...; सभेचा VIDEO व्हायरल
14
'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?
15
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान; धोनीनेही साक्षीसह हक्क बजावला 
16
जम्मू-काश्मीरमध्ये किती दहशतवादी आहेत? यात पाकिस्तानी आणि स्थानिक किती? मोठा खुलासा समोर
17
नवा फ्रॉड! सेल्फीच्या नादात तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; हॅकर्स रचतात 'असा' कट
18
अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलीये का?; निवृत्त न्यायमूर्ती चांदिवालांनी सांगितलं रिपोर्टमध्ये काय?
19
५०% घसरू शकते Zomato ची शेअर प्राईज; ब्रोकरेजनं दिलं ₹१३० चं टार्गेट, अंडरपरफॉर्म रेटिंगही कायम
20
VIDEO: उमेदवाराने थेट उपजिल्हाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली; पोलिसांसमोर घडली घटना

सर्वच पक्षांसाठी जळगाव महत्त्वाचे! मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, संजय राऊत मुक्कामी

By ajay.patil | Published: November 11, 2024 11:26 AM

Maharashtra Assembly Election 2024 And Jalgaon Assembly Constituency : जळगाव जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा रविवारी पार पडली. तर सोमवार, ११ रोजी उद्धव ठाकरे व शरद पवार यांची सभा पार पडणार आहे.

जळगाव : विधानसभेच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा रविवारी पार पडली. तर सोमवार, ११ रोजी उद्धव ठाकरे व शरद पवार यांची सभा पार पडणार आहे. या रणधुमाळीत दिग्गज नेत्यांचा मुक्काम मात्र जळगावात राहणार आहे. त्यामुळे बड्या नेत्यांसाठी जळगाव का महत्वाचे..? याबाबतची उत्सुकता वाढली आहे. 

सोमवारी शरद पवार यांच्या चार सभा जळगाव जिल्ह्यात होणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्याही दोन सभा होणार आहेत. शरद पवार यांच्या सभा झाल्यानंतर ते सोमवारी रात्री जळगाव शहरात मुक्कामी थांबणार आहेत. जैन हिल्स येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे. तर १२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मुक्कामी थांबणार आहेत. उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांचाही आगामी आठवड्यात जळगावात मुक्काम राहणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जळगावमधील ११ जागांसाठी चांगले प्रयत्न केले जात आहेत.

जळगाव जिल्हा का महत्वाचा? 

उद्धव सेना 

फुटीनंतर जिल्ह्यातील पाच आमदार शिंदेसेनेकडे गेल्यामुळे उद्भव सेनेला मोठा धक्का बसला होता. जिल्ह्यातील पाचही आमदार नसल्यामुळे संघटनेवरही परिणाम झाला. या निवडणुकीत उद्धव सेना चार जागा लढवित असून, उद्धव ठाकरेंच्या दोन सभा जिल्ह्यात आहेत. यासह आदित्य ठाकरेंचीही निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या काळात पाचोरा येथे एक सभा झाली. उध्ववसेनेसाठी यावेळची ही निवडणूक म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. 

शिंदेसेना 

शिवसेनेत फुट पडल्यानंतर जिल्ह्यातील ५ आमदार हे शिंदेसेनेत गेले. फुटीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. फुटीनंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यात अनेक सभा घेऊन, शिंदेसेनेच्या आमदारांना टार्गेट केले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील जळगाव जिल्ह्याचे सर्वाधिक दौरे करून, डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला आहे. तोच दबाव कायम राखत उध्दवसेनेला झाकोळून टाकण्याची शिंदेसेनेला ही संधी आहे. 

भारतीय जनता पक्ष 

लोकसभेच्या निवडणुकांप्रमाणे विधानसभेतही जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत अमळनेर, रावेर, मुक्ताईनगरात भाजपचा पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत यापैकी मुक्ताईनगर, अमळनेरची जागा भाजपने मित्र पक्षाला दिल्या आहेत. भाजप यंदाच्या निवडणुकीत २०१९ च्या तुलनेत दोन जागा कमी लढत आहे. मात्र, ज्या पाच जागांवर भाजप उमेदवार रिंगणात आहेत. त्या जागांवरील विजय भाजपसाठी महत्वाचा आहे. २०१४ मध्ये भाजपचे ६ आमदार जिल्ह्यात होते. तर २०१९ मध्ये ही संख्या ४ वर आली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत १०० टक्के यश मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

अजित पवार गट 

जळगाव जिल्ह्यात अजित पवार गटाच्या वाट्याला अमळनेरची एकमेव जागा आली आहे. मंत्री अनिल पाटील यांच्या प्रचारासाठी अमळनेरमध्ये सभेचे नियोजन सुरू आहे.

काँग्रेस

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने केवळ १ जागा लढविली होती. त्यात ती जागा जिंकून कॉग्रेसने १०० चा स्ट्राईक रेट ठेवला. तर यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत तीन पक्ष असतानाही, जागा वाटपात आपल्याकडे ३ जागा खेचत काँग्रेसने बाजी मारली आहे. आता जागा वाटपात मारलेली बाजी विधानसभेच्या रिंगणातही मारली जाते का..? याकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गट 

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटात फुट पडल्यानंतर पक्षाचे दोन गट पडले आहेत. जिल्ह्यात फारसा फरक यामुळे पडलेला नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जात असला तरी लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाने जळगाव शहरची जागा उद्धव सेनेला सोडली. तसेच २०१९ मध्ये ११ पैकी ९ जागा लढणाऱ्या या पक्षाला यंदाच्या जागा वाटपात केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. आता या चार जागांपैकी जास्तीत जास्त जागा खेचण्याचा प्रयत्न शरद पवार गटाचा आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४JalgaonजळगावEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत