प्रशांत भदाणे
भाजपला संविधानाची चिरफाड करायची होती. म्हणून त्यांना लोकसभेत 400 खासदार निवडून आणायचे होते, असा घणाघाती आरोप शरद पवारांनी केला. ते जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. दरम्यान, संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा हा डाव आम्ही हाणून पाडला, असेही ते म्हणाले.
या सभेला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, पारोळ्याचे शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. सतीश पाटील, काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले की, या देशाला एकसंघ ठेवण्याचं काम संविधानाने केले. हेच संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलंय. हा देश आजपर्यंत एकसंघ राहिला तो संविधानामुळे. पण हेच संविधान बदलण्याचा प्रयत्न भाजपने केला. लोकसभेत आम्ही याच संदर्भात जागृती केली. इंडिया नावाची आघाडी काढली. घटनेची चिरफाड करण्याचा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडला, असं त्यांनी सांगितलं.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महाराष्ट्राची निवडणूक आलीय, आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कुणी आणि कसा करायचा याचा निर्णय घ्यायचाय.
महाराष्ट्राच्या राजकारणाला तुम्ही शक्ती द्याल.
घटना बदलण्याचा त्यांचा प्रयत्न होता, म्हणून लोकसभेत 400 खासदार मोदींना हवे होते.
या देशाला एकसंघ ठेवण्याचं काम संविधानाने केले.
हेच संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलं.
हा देश आजपर्यंत एकसंघ राहिला तो संविधनामुळे.
लोकसभेत आम्ही याच संदर्भात जागृती केली.
इंडिया नावाची आघाडी काढली.
घटनेची चिरफाड करण्याचा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडला.
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने त्यांनी सत्ता स्थापन केली.
आज देशातल्या शेतकऱ्यांची, तरुणांची आज काय अवस्था आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत.
सोन्यासारखा जीव देण्याचा का त्यांनी निर्णय घेतला असावा, कारण शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही.
माझ्याकडे देशाच्या कृषी खात्याचं काम होतं, तेव्हा यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तेव्हा मला झोप आली नाही.
तेव्हा देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला.
हे करण्याची आवश्यकता होती, पण आज तिचं अवस्था असताना सरकार काहीही करायला तयार नाही.
आज देशात महिलांवर अत्याचार सुरू आहेत.
बदलापूरमध्ये लहान मुलांवर अत्याचार घडले, अशी किती तरी उदाहरण सांगता येतील.
लाडकी बहीण योजनेबद्दल हरकत नाही पण आज लाडक्या बहिणींची अवस्था काय?
9 हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत, यासंदर्भात सरकार काय करतंय?
तरुणांची हीच अवस्था आहे.
आम्ही आमचं सरकार आलं तर पुढील पाच गोष्टी करणार.
लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आम्हीही दर महिन्याला तीन हजार रुपये दिले जातील.
महिला आणि मुलींना एसटी प्रवास मोफत.
शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करू, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान देऊ.
जातीनिहाय जनगणना करू.
बेरोजगार तरुणांना महिन्याला चार हजार देण्याचा प्रयत्न.
प्रत्येक व्यक्तीचा २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा.
सतीश पाटलांनी थांबायचं की नाही हा निर्णय तुम्ही नाही पक्षाध्यक्ष म्हणून मी घेईल.