Maharashtra Assembly Election 2024 : जळगाव : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पहिल्या प्रशिक्षणावेळी सकाळच्या सत्रात ७५ जणांनी, तर दुपारच्या सत्रात ५२ जण गैरहजर राहिले. या गैरहजर राहिलेल्या प्रशिक्षणार्थींना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
मार्गदर्शनानंतर घेतली लेखी परीक्षा प्रशिक्षणाच्या सकाळच्या सत्रात १२०० प्रशिक्षणार्थींना बोलविण्यात आले होते. या वेळी ११२५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. तर दुपारच्या सत्रात १२७५ जणांपैकी १२२३ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षणावेळी बीएलओ व कर्मचाऱ्यांना मतदानावेळी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन झाल्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली. यावेळी मतदान केंद्रप्रमुखांना प्रात्यक्षिक दाखवून मशीन कसे सुरू करावे, त्यानंतर गावातील तीन जणांना सोबत घेऊन ईव्हीएमचे प्रात्यक्षिक कसे दाखवावे याबाबत सखोल माहिती देण्यात यावेळी आली.