शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
2
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
3
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
4
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
5
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
6
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
7
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण
8
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
9
"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
10
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
11
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
12
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
13
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
14
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
15
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
16
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
17
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
18
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
19
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
20
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

ST अपघात: आपुले मरण पाहिले म्या डोळा... मृत्यूच जणू करीत होता पाठलाग... अविनाशने ठेवले स्टेटस!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 8:39 AM

अविनाश परदेशी हा मुलगी पाहण्यासाठी इंदूर येथे गेला होता. स्थळ पाहून तो परत येत होता.  

संजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर (जि. जळगाव) : इंदूरहून निघालेली अमळनेर आगाराची ही नवी बस घाट लागण्यापूर्वी एका ठिकाणी प्रवाशांच्या विश्रांतीसाठी थांबली होती. बस थांबली असली तरी, मृत्यू मात्र बसचा जणू पाठलागच करीत होता की काय, अशी शंका यावी. कारण निंबाजी पाटील व अरवा बोहरी या दोघांनीही आपण दोन-तीन तासांत घरी पोहोचत असल्याचा शेवटचा फोन केला होता, तर अविनाश परदेशी याने वे टू पाडळसरे, असे स्टेटस ठेवले होते. नंतर मात्र अपघाताचा निरोप आल्याने परिवारावर जणू दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

अविनाश परदेशी हा मुलगी पाहण्यासाठी इंदूर येथे गेला होता. स्थळ पाहून तो परत येत होता.  त्याने मोबाईलवरील  व्हाॅट्स ॲपवर वे  टू पाडळसरे, असे स्टेटस ठेवले होते. त्याचे नातेवाईक मित्रही वाट पाहत होते. मुलगी पसंद पडली की नाही, हे ऐकण्याची सर्वांना उत्सुकता लागली होती. पण, अविनाश हा पाडळसरे येथे आलाच नाही.

आपुले मरण पाहिले म्या डोळा...

इंदूर येथे दोन-चार दिवस मुलाकडे राहून परतणाऱ्या पती निंबाजी पाटील यांची पत्नी आणि मुले वाट पाहत होते. वाटेत बालाघाटनजीक त्यांची बस नर्मदा नदीत कोसळली. निंबाजी पाटील यांच्याकडे असलेल्या आधारकार्डावरून त्यांची ओळख पटली. निंबाजी यांच्याकडे पत्नी कमलबाई यांचेही आधारकार्ड आढळले... आणि मग अपघातात निंबाजी यांना पत्नीसह जलसमाधी मिळाल्याची वार्ता पसरली... ती पिळोद्यापर्यंत पोहोचली....गावातील लोक पाटील यांच्या घराजवळ जमा झाले.... नातेवाइकांचे फोन येऊ लागले....आणि कमलाबाई घरात असल्याची खात्री अनेकांनी करून घेतली... पण त्याआधी बराचवेळ कमलाबाई यांना या घटनेची माहिती देण्यात आली नव्हती. पण शेवटी घरासमोर जमलेली गर्दी पाहून त्या काय ते समजल्या आणि हंबरडा फोडला.

अरवा बोहरा जात होत्या माहेरी अमळनेरला

मूर्तिजापूर (जि. अकोला) येथील अरवा मुर्ताझा बोहरा (२७) या मूर्तिजापूरवरून इंदूर येथील आजारी मावशीला भेटायला गेल्या होत्या. १८ जुलै रोजी इंदूरवरून आपल्या माहेरी अमळनेर येथे जाण्यासाठी अपघातग्रस्त बसमधून प्रवास करीत होत्या; परंतु बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अरवा बोहरा यांचा विवाह मूर्तिजापूर येथील हुसैनी हार्डवेअरचे मालक हुसैन उर्फ अख्तर अकबर अली सैफी यांचा मुलगा मुर्ताझा हुसैन सैफी यांच्या सोबत २०१८ मध्ये झाला. अरवा यांचे माहेर अमळनेर असल्याने त्या इंदूरवरून एकट्याच अमळनेरसाठी प्रवास करीत होत्या. एक दिवस माहेरी थांबून १९ जुलै रोजी त्या मूर्तिजापूर येथे परत येणार होत्या. परंतु नियतीला ते मान्य झाले नाही. त्यांच्यावर मधेच काळाने झडप घातली. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूची वार्ता मूर्तिजापूर येथे समजताच सर्वत्र शोककळा पसरली.

अमळनेर येथे चालक-वाहकाच्या मृत्यूने हळहळ

अमळनेर आगारातील बसचालक चंद्रकांत एकनाथ पाटील हे रा. ढे कू रोड अमळनेर येथे परिवारासह वास्तव्यास होते. सात ते आठ वर्षांपूर्वी ते अमळनेर आगारात रुजू झाला होते. त्यापूर्वी ते शहादा आगारात नोकरीला होते. त्यांचे वडील ग्रामीण रुग्णालयात चालक होते. ते सेवानिवृत्त झाले असून त्यांचा भाऊदेखील एसटीमध्ये नोकरीला आहे. चंद्रकांत यांना आठ वर्षांची मुलगी असून ती इयत्ता तिसरीला तर चार वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या मृत्यूने परिसर व एसटी कर्मचाऱ्यात हळहळ व्यक्त होत होती.

प्रकाश श्रावण चौधरी (रा. शारदा कॉलनी) या वाहकाचा या अपघातात मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मुलगा मोठा २२ वर्षांचा बारावी व आयटीआय झाला आहे. मुलगी १७ वर्षांची असून ११ वीला आहे. प्रकाश यांचा भाऊ केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकात आहे.

१२ मृतदेह काढले बाहेर : वाहक प्रकाश चाैधरी (४०), चालक चंद्रकांत पाटील (४५), अविनाश परदेशी (अमळनेर), निंबाजी पाटील (६०, अमळेनर), अरवा बोहरा (२७, अमळनेर), राजू तुळशीराम (३५, राजस्थान), जगन्नाथ जोशी (६८, राजस्थान), चेतनराम जागीड (जयपूर), सैफउद्दीन बोहरा (इंदूर), विकास बेहरे (३३, धुळे), कल्पना विकास पाटील (५७, धुळे), रुख्मिणीबाई नारायणलाल जोशी (राजस्थान).

या अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीला तातडीने चौकशी करण्यास सांगितले आहे. अपघातातील सर्व मृतदेह धामणोत येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून, अजूनही शोधमोहीम सुरू आहे. - शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, राज्य एसटी महामंडळ

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेर