महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर प्रवेश बंदी, प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 10:30 PM2021-03-07T22:30:07+5:302021-03-07T22:30:34+5:30

सीमा नाका लोणीजवळ शेकडो प्रवासी व गाड्यांना मज्जाव करण्यात आल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Maharashtra-Madhya Pradesh border entry ban, condition of passengers | महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर प्रवेश बंदी, प्रवाशांचे हाल

महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर प्रवेश बंदी, प्रवाशांचे हाल

googlenewsNext
ठळक मुद्देसीमावर कडक तपासणी, कोरोना चाचणीचा अहवाल बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्क

केऱ्हाळे, ता. रावेर : महाराष्ट्र राज्यातून मध्यप्रदेश राज्यात जाण्याकरिता सीमा नाका लोणीजवळ सकाळपासून कोरोना ॲन्टिजेन तपासणी निगेटिव्ह असलेल्या प्रवाशांना जाण्यास परवानगी असल्याचे सांगत शेकडो प्रवासी व गाड्यांना मज्जाव करण्यात आल्याने काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोरोनाच्या धर्तीवर अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे प्रवाशांना भयंकर त्रास सहन करावा लागला. सीमेवर अडवणूक पाहता काहींनी सीमा नाक्यावर गाड्या सोडून पायी चालत काही अंतरावर नातेवाईकांना सांगून मध्य प्रदेशातील गाड्या बोलावल्या व आपले प्रवासाचे ठिकाण गाठले. 

ढकाही आल्या पावली घरी परतले. मात्र महामार्गावर येणाऱ्या गाड्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेल्यामुळे कालांतराने खासगी वाहनांना अनुमती देण्यात आली. 

एसटी बंद ... 

रावेरहून बुऱ्हाणपूर व बुऱ्हानपूरहून रावेर येणाऱ्या एस. टी. बसेस बंद करण्यात आल्या आहेत. 

प्रवाशांची क्रॉसिंग सुरू

बसेस बंद झाल्यामुळे प्रवाशांनी ऑटो रिक्षाचा मार्ग शोधून काढला. दोन्ही सीमेच्या बाजूला लांब  थांबून प्रवाशांची क्रॉसिंग सुरू असून आपला प्रवास करीत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Maharashtra-Madhya Pradesh border entry ban, condition of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.