अमळनेर, जि. जळगाव : अमळनेर शहराच्या पूर्वेला असलेल्या अंबर्शी टेकडीवर शासकीय अधिकारी, कर्मचारी व समाजसेवकांनी मंगळवारी महाश्रमदान केले. ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ला चालना आणि स्वच्छता अभियानाला भर देऊन टेकडीवरील गवत, कचरा सफाई, झाडांना संरक्षण आणि रस्ते साफसफाई करून टेकडीच्या सौंदर्यात भर टाकण्यात आली.अमळनेर शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र तसेच अंबरीश राजाचे मंदिर, विष्णूचे मंदिर या टेकडीवर आहे. जलशुद्धीकरण यंत्रणेतून वाया गेलेल्या पाण्याचा वापर करून टेकडी ग्रुप व शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक झाडे टेकडीवर लावण्यात आली आहेत. दररोज सकाळ- संध्याकाळी फिरायला व व्यायामाला नागरिक येत असतात. मात्र झाडांच्या आजूबाजूला गवत वाढून काही दिवसांपूर्वी काही समाजकंटकांच्या वात्रटपणामुळे झाडे जळाली होती. याशिवाय पर्यटक तसेच दर्शनाला येणाºया भाविकांमुळे कचरा वाढू लागला होता. प्रांताधिकारी सीमा अहिरे व टेकडी ग्रुपने नियोजन करून सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व समाजसेवकांच्या मदतीने १७ रोजी सकाळी महाश्रमदान आयोजित केले होते.यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, प्रांत सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी भारत वारे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, पालिकेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी, टेकडी ग्रुपचे मोतीलाल जैन, मधुकर दुसाने, आशिष चौधरी, डॉ.विलास वाणी, उमेश धनराळे, हेमंत पाठक, राजेंद्र भावसार, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, सोमचंद संदानशिव, संतोष बिºहाडे, सुनील भामरे, पंकज चौधरी, डॉ.राजेंद्र सोनार, संतोष पाटील यांनी चात्या खोदून कचºयाची विल्हेवाट लावली. महसूल कर्मचारी, तलाठी, कृषी विभागाचे कर्मचारी, पालिका, पंचायत समिती, आरोग्य विभागाचे कर्मचारी आदींनीही श्रमदान केले.या सामूहिक श्रमदानाने फिट इंडिया मुव्हमेंट आणि स्वछता अभियान राबवून टेकडीच्या सौंदर्यात भर पडली.
अमळनेरात अंबर्शी टेकडीवर महाश्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 2:59 PM
अंबर्शी टेकडीवर शासकीय अधिकारी, कर्मचारी व समाजसेवकांनी मंगळवारी महाश्रमदान केले.
ठळक मुद्देफिट इंडिया मुव्हमेंट व स्वच्छता अभियानाचा समन्वयशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खोदकाम, गवत व कचºयाची केली सफाईश्रमदानातून केले वृक्षारोपणही