फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे सत्याचा शोध घेणारा कृतिशील समाजसुधारक असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी येथे केले.तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण आणि उत्सव समितीच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ.अनिल भंगाळे होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.डॉ.उदय जगताप होते.कार्यक्रमाची सुरूवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण आणि पुष्प अर्पण करून झाली.सूत्रसंचालन प्रा.डॉ.आय.पी.ठाकूर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर नितीन सपकाळे, सिद्धार्थ तायडे, शेखर महाजन, चेतन इंगळे, अमोल राणे यांनी मार्गदर्शन केले.
फैजपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 7:32 PM
फैजपूर , ता.यावल, जि.जळगाव : महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे सत्याचा शोध घेणारा कृतिशील समाजसुधारक असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी ...
ठळक मुद्देमहात्मा ज्योतिबा फुले म्हणजे सत्याचा शोध घेणारा कृतिशील समाजसुधारकधनाजी नाना महाविद्यालयात झाला कार्यक्रम