शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णांसाठी कोट्यवधींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 7:54 AM

जळगावात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना : जळगाव जिल्ह्यातील ६२ हजार रुग्णांचे १२७ कोटी अदा

विलास बारी/जळगाव, दि. 15 - गोरगरीब रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार घेता यावे यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील १२ लाख ७५ हजार १५८ रुग्णांवरील शस्त्रक्रियेवर २८६० कोटी ७३ लाख ५४ हजार १८१ रुपयांचा निधी राज्य शासनातर्फे खर्च करण्यात आला आहे.गरिबांना असलेल्या दुर्धर आजारावर उपचार करता यावे यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शुभ्र कार्ड वगळता केशरी, पिवळे व अंत्योदय कार्डधारक कुटुंबातील सदस्यांना असलेल्या आजारावर शासनाने राज्यभरात नियुक्त केलेल्या ४८४ रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. त्यात ९७१ आजारांवर उपचार करण्यात येत असतात.फसवणूक टाळण्यासाठी चित्रीकरणगतकाळात काही रुग्णालयांमध्ये बोगस रुग्ण दाखवून रक्कम वसूल करण्यात आल्यानंतर शासनाने ज्या रुग्णांवर उपचार केले त्याचे चित्रीकरण करणे बंधनकारक केले आहे. तसेच रुग्ण दाखल झाल्यानंतर दोन तासात मुंबई येथील कार्यालयाकडून उपचाराची परवानगी मिळणे क्रमप्राप्त आहे. रुग्णालयांकडून उपचारावरील खर्च अवाच्या सवा लावण्यात येऊ नये यासाठी आजारावर उपचारासाठीची राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे रक्कम ठरवून दिली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हॉस्पिटलला रुग्णाच्या जेवणासह डिस्चार्ज दिल्यानंतर घरी जाण्यासाठी प्रवासखर्चदेखील बंधनकारक करण्यात आला आहे.१२ लाख ७५ हजार रुग्णांवर २८६० कोटींचे उपचारमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत राज्यभरातील १४ लाख २६ हजार २६२ रुग्णांनी उपचारासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे पूर्व परवानगी मागितली होती. त्यानुसार १४ लाख १४ हजार ८६८ रुग्णांना परवानगी देऊन १२ लाख ७५ हजार १५८ रुग्णांवर शस्त्रक्रिया करून २८६० कोटी ७३ लाख ५४ हजार १८१ रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ६७ हजार रुग्णांवर शस्त्रक्रियाजळगाव जिल्ह्यातील ३८ लाख नागरिक उपचारासाठी पात्र ठरलेले आहेत. जिल्हा रुग्णालयासह १८ खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू आहे. त्यात आतापर्यंत ६६ हजार ९९७ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यापैकी ६१ हजार ९१५ रुग्णांच्या शस्त्रक्रियेची १२७ कोटी २६ लाख ७० हजार ३७२ रुपयांची रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे रुग्णालयांना अदा केली आहे.

शुभ्र कार्ड वगळता अन्य रेशन कार्डधारक या योजनेसाठी पात्र ठरतात. रुग्णांना तत्काळ उपचार व योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या योजनेचा लाभ देण्यात येणाºया प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आरोग्यमित्र नियुक्त केलेला असतो. अनेक रुग्णांचे रेशन कार्डवर व आधार कार्डवर वेगवेगळे आडनाव असतात. त्या वेळी उपचाराला विलंब होतो. दोन्ही कागदपत्रांवर एकच आडनाव असल्यास तत्काळ उपचार मिळतात. जळगाव जिल्ह्यातील ६१ हजार ९१५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करीत १२७ कोटी २६ लाख ७० हजार ३७२ रुपयांचे मोफत उपचार करण्यात आले. -डॉ. चेतन पाटील, जिल्हा समन्वयक, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, जळगाव.