जळगाव : सर्वोच्च न्यायालयात निकाल लागून जळगावातील सागर पार्कची जागा महापालिकेच्या मालकीची झाली असली तरी या जागेच्या मूळ मालकाला वाढीव मोबदला मिळावा, यासाठी महाविकास आघाडीने १०० कोटी रुपयांची सुपारी घेतली आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यासाठी थेट मंत्रायलयातून मनपा आयुक्तांवर दबाब येत असून महिला वकील येऊन आयुक्तांना या विषयी वारंवार विचारणी करीत असल्याचाही आरोप आमदार भोळे यांनी केला.
भाजपच्यावतीने रविवारी दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीला दिलेल्या सफाईच्या मक्त्यासाठी नगरसेवकांना ‘पाकीट’ दिले जात असल्याचे विरोधक आरोप केले करीत असल्याच्या मुद्द्यावर आमदार सुरेश भोळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील आरोप केला.
या वेळी ते म्हणाले की, महापालिकेवर आरोप केले जातात. मात्र महापालिका जे काम करते, त्याविषयी दबाब आणला जातो. अशाच प्रकारे आता सागर पार्कच्या जागेसाठी मनपा आयुक्तांवर थेट मंत्रालयातून दबाव येत असल्याचा आरोप आमदार भोळे यांनी केला. यामध्ये सागर पार्कच्या जागेचा मोबदला मूळ मालकाला दिला आहे. तरीदेखील वाढीव मोबदला मागितला जात आहे. इतकेच नव्हे यासाठी सरकारी वकीलही मॅनेज केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.