लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या आढाव्यासाठी जिल्हा काँग्रेसची प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. जमत असेल तर मित्र पक्षांसोबत आघाडी करा अन्यथा स्वतंत्र लढा, असे अधिकार स्थानिक पातळीवरच दिल्याची महिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी दिली. काँग्रेस भवनात दुपारी २ वाजता आयोजित याबैठकीला जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदीया यांनीही मार्गदर्शन केले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ॲड. संदीप पाटील होते. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसचे जिल्हास्तरीय सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन रित्या ताकदीनिशी सामोरे जाण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा काँग्रेसच्या येतील यासाठी रणनीती आखण्यात आली. ग्रामीण भागात तळागाळापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचलेला असल्याने त्याचा फायदा या निवडणुकीत निश्चित होणार असल्याचा व्यक्त करण्यात आला. यासह ब्लॉक निहाय आढावा घेण्यात आला. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जेष्ठ नेते डी. जी. पाटील, माजी आमदार निळकंठ फालक, माजी जिल्हा अध्यक्ष राजीव पाटील, उदय पाटील, सुरेश पाटील, माजी शहर अध्यक्ष डॉ. ए. जी. भंगाळे, सुलोचना पाटील, जमील शेख, अविनाश भालेराव, योगेंद्र पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. हितेश पाटील, एन.एस. यु आय जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे, मुनावर खान, प्रतिभा मोरे, विकास वाघ, अँड. अमजद पठाण, सचिन सोमवंशी, शंकर पहेलवान, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.