ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.9- महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता शहरातील दूध फेडरेशन भागात तीन बहरलेल्या मोठय़ा झाडांची तोड करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रार केल्यानंतरही मनपाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
वीजेच्या तारांना अडथळा ठरणा:या झाडांच्या फाद्या काही भागात तोडल्या जात आहेत. मात्र दूध फेडरेशननजीकच्या महावीर नगरात 5 रोजी काही व्यक्तींनी अचानक येऊन झाडे तोडण्यास सुरूवात केली. यात दोन लिंबाची झाडे व अन्य एक झाड तोडण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शविला असता या व्यक्तींनी कोणतीही दखल घेतली नाही. झाड तोडण्यापूर्वी महापालिकेची परवानगी आवश्यक असते, मात्र या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता झाडे तोडण्यात आल्याचे रामदास विरखट यांनी जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे.