जळगाव : ‘महावितरण’च्या सावदा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आकाश रामचंद्र पाटील (वय 38, मूळ रा. विवरे, ता.रावेर) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी पहाटे साडेचार वाजता मृत्यू झाला़ कामाची अतिरिक्त जबाबदारी, ताणतणाव तसेच वरिष्ठ अधिका:यांची असभ्य वागणूक यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय व कर्मचारी संघटनेने केला आहे. महावितरणची थकबाकी वसुलीची मोहीम सुरू आह़े त्यांच्यावर वरिष्ठांचा वसुलीसाठी दबाव होता, अशी माहिती मयत आकाश यांचे मोठे भाऊ प्रशांत पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)
महावितरण अभियंत्याचा हृदयविकाराने मृत्यू
By admin | Published: January 08, 2017 1:02 AM