शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
4
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
5
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
6
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
7
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
8
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
9
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
10
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
11
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
12
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
13
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
14
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
15
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
16
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
17
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
18
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
19
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
20
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम

सातपुड्यात दरवळला महू फुलांचा सुगंध

By admin | Published: March 19, 2017 12:44 AM

हंगामाला सुरुवात : प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त, अनेकांना मिळाला रोजगार

कोठार : सातपुडा पर्वतरांगेत महूच्या हंगामास सुरुवात झाली असून, सध्या सातपुड्याच्या पर्वतरांगा व पायथ्याशी महूच्या फुलांचा सुगंध दरवळू लागला आहे.आयुर्वेदात महत्त्वाच्या समजल्या जाणाºया महूच्या फुलांचे सातपुडा पर्वतरांगेत मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. या भागातील स्थानिक आदिवासींच्या मालकीची असणारी शेकडो महूच्या फुलांची झाडे सातपुड्याच्या पंचक्रोशीत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला संक्रमणाच्या काळात महूच्या झाडांना फुलांचा बहर येतो. दरवर्षी ही महूची फुले स्थानिक आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात हंगामी स्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून देतात.यावर्षीही सातपुड्याच्या पंचक्रोशीतील महूच्या झाडांच्या फुलांचा चांगला बहर आला असून, महूच्या फुलांचे संकलन करताना स्थानिक दिसून येत आहे. संकलित केलेली महूची फुले वाळीत घालून त्यापासून मद्यनिर्मिती केली जाते. आदिवासी समाजामध्ये विशेषत: सातपुड्यातील जमातीमध्ये महूपासून तयार केलेल्या मद्याला खूप महत्त्व असते. लग्न समारंभामध्ये येणाºया पाहुण्यांचा आदरातिथ्य महूपासून निर्मित मद्याने केला जातो. त्याला खूप मानाचे स्थान असते. येणाºया काळात लग्न समारंभ असणाºया घरातील सदस्य जाणीवपूर्वक त्यासाठी महू फुलांचे संकलन करताना पाहायला मिळत आहेत. तर अनेक जण संकलित केलेली महूची फुले बाजारात विक्री करून पैसे कमवित आहेत. ओल्या असणाºया महू फुलांना साधारणत: ४० ते ५० रुपये किलो तर वाळलेल्या महूच्या फुलांना ५० ते ७० रुपये किलो याप्रमाणे भाव मिळतो.धडगाव, तळोदा, अक्कलकुवा व मोलगीच्या बाजारात महूच्या फुलांना चांगली मागणी असते. महूच्या फुलांपासून तयार होणारे मद्य जीर्ण खोकल्यावर प्रभावी औषध असून, महूची फुले ही शरीराच्या रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच पोटदुखी, कृमीजन्य विकार, खोकला यावर गुणकारी आहेत. त्यामुळे महूच्या फुलांची उसळ करून खाल्ली जाते. शिवाय महूच्या फुलांचीदेखील आयुर्वेदिकदृष्ट्या उपयुक्त असते. सांधेदुखी व मुक्या माराच्या ठिकाणी महूची फुले गरम करून लावल्यास आराम पडतो.यंदाच्या वर्षी बहराच्या हंगामात हवामानातील बदलामुळे महू फुलांवर प्रतिकूल परिणाम होऊन दरवर्षीपेक्षा यंदा येणारा बहर हा कमी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.गेल्या १० वर्षांपूर्वी हजारोंच्या पटीने असणारी महूच्या झाडांची संख्या शेकडोंवर आली आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगेत होणारी अवैध वृक्षतोड ही यामागील मुख्य कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या परिसरात महूच्या वृक्षांचे संवर्धन करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, याठिकाणी व्यक्तिगत मालकीची झाडे शिल्लक राहिली आहेत.         (वार्ताहर)महूवर प्रक्रिया करणारे उद्योग हवेदरवर्षी बहरणारी महूची झाडे आपल्या बहारासोबतच स्थानिकांसाठी हंगामी रोजगार घेऊन येतात. शेताच्या बांधावर अनेक महिला-पुरुषांबरोबर शालेय विद्यार्थी महू फुलांची वेचणी करताना दिसून येतात. या महू फुलांच्या विक्रीतून त्यांना आर्थिक फायदा होत असतो.महू फुलांच्या हंगामात या फुलांवरील प्रक्रियेबाबतच्या चर्चेत भर पडत असते. परंतु इतर कालावधीत त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असते. या फुलांवर प्रक्रिया करणारे उद्योग जर सातपुड्यात उभारण्यात आले तर मोठ्या प्रमाणात या परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच महूपासून तयार करण्यात येणाºया उत्पादनास राष्टÑीय, आंतरराष्टÑीय स्तरावर पोहोचविल्यास महू उत्पादकांना मोठा फायदा होऊ शकतो. परंतु त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.